

नवी सांगवी(पुणे) : जुनी सांगवीतील कुंभारवाडा व परिसरातील गणेशमुर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमधुन कारागीर मंडळींची लगबग सुरू झाली आहे. जुनी सांगवीतील कुंभारवाड्यातील श्रीं च्या मुर्तीस सांगवीसह शहरात मोठी पसंती आहे. येथे सर्व
प्रकारच्या मुर्त्या कलाकार तयार करतात. प्लँस्टर पँरीस मुर्त्यांना जास्त मागणी असली तरी शाडु मातीच्या मुर्त्यांनाही सध्या मागणी वाढत आहे. अनेक सार्वजनिक मंडळे, घरगुती गणेश उत्सवासाठी हव्या तशा गणेश मुर्त्यांसाठी ऑर्डर देण्यासाठी सांगवीतील कारागीर मंडळींना पंचक्रोशीत मोठी मागणी असते. यामुळे कुंभारवाड्यात वर्दळ सुरू आहे.
दर वर्षी वेगवगळ्या संकल्पनेतील मुर्तींना विशेष मागणी असते. या वर्षी मुंबई फेसिंग हा मुंबईतील मुर्ती पॅटर्न, पुणेरी पॅटर्न मध्ये प्लेन दगडूशेठ व आदी पुण्यातील साधी बैठक असलेल्या मुर्त्यांना मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर या मुर्त्या बनविण्यात को-या मुर्तींना रंगकाम करताना कारागिर मंडळी रमली आहेत.
फेटाधारी जय मल्हार, जय हनुमान, बाहुबली, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार अशा गणेश मुर्तींना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी असते. यावर्षी दिड फुटांच्या मुर्ती साधारण सतराशे ते दोन हजार, शाडू मातीच्या अडीच ते तीन हजार अशा मुर्त्या कला कुसरीनूसार दर राहिल तर सर्वसामान्यांना परवडणा-या प्लँस्टर ऑफ पँरीसच्या मुर्त्यांही येथे उपलब्ध आहेत. एक फुटांपासून पाच फूटापर्यंतच्या मुर्त्या येथे तयार केल्या जातात.
यावर्षी आमच्याकडे विविध रूपातील गणेशमुर्ती उपलब्ध आहेत. घरगुती एक फुटापासून ते मोठ्या मंडळाच्या मागणीनूसार मुर्त्या उपलब्ध आहेत. काही मागणीनुसार बनवल्या जातात. सध्या रंग, कच्चामाल, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे यावर्षी मुर्ती दरात वाढ झाली आहे. हा आमचा पिढीजात व्यवसाय असून, लोकांच्या मागणीनुसार मुर्ती बनवुन दिली जाते.
कपिल कुंभार,
जुनी सांगवी.