

पुणे: राज्यातून पाऊस कमी होणार, अशी स्थिती शनिवारपर्यंत होती; मात्र रविवारी दुपारी अचानक वातावरणात मोठे बदल झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून जोरदार सक्रिय झाला. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राला आगामी सात दिवस ‘मुसळधारे’चा अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भ अन मराठवाड्यात मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ तर 25 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. (Latest Pune News)
पाकिस्तानात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम उत्तर भारतावर झाला, तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने रविवारी अचानक मान्सून सक्रिय झाला.
त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते मध्यम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आगामी सात दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधार ते मुसळधार तर विदर्भ आणि मराठवाड्याला मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला.
ऑरेंज अलर्टः पालघर (4), रायगड रत्नागिरी (3.4), सिंधुदुर्ग (3), पुणे घाट (3, 3), कोल्हापूर घाट (2, 3, 4), सातारा घाट (2.3, 4)
समुद्रसपाटीवरील मान्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकत आहे.
राजस्थान, मध्य प्रदेशात चक्रीय स्थिती.
उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या पंजाब प्रांतावर पश्चिमी चक्रवात सक्रिय
वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र
2 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. त्यामुळे पाऊस वाढणार
पुढील 7 दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात प्रदेश, कर्नाटकात मुसळधार ते अतिमुसळधार
हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लद्दाखमध्ये अतिमुसळधारेचा अंदाज.
पुढील 7 दिवस उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशात अतिमुसळधार