

कोंढवा: कोंढवा बुद्रुक येथील शांतीबन सोसायटी ते पवार शाळेपर्यंत जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यात अनधिकृतपणे मलनिस्सारण वाहिनीचे पाणी सोडून देण्यात आले आहे. गावठाण व सव्ऱ्हे नं. 3 लक्ष्मीनगर यांच्या मधून वाहणाऱ्या या नैसर्गिक नाल्यात ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्याने या नाल्याच्या अवतीभवती वास्तव्यास असणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नैसर्गिक नाल्यात झालेल्या कचऱ्याच्या सामाज्यामुळे हे दुर्गंधीयुक्त पाणी अडून तयार झालेल्या डबक्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. यासंदर्भात युवक काँग््रेासचे दादाश्री कामठे यांनी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुचिता पानसरे तसेच पुणे मनपाच्या मलनिस्सारण खात्याचे कार्यकारी अभियंता अजय वायसे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
हे दुर्गंधीयुक्त पाणी तत्काळ थांबवून नालेसफाई करावी आणि अनधिकृतपणे मलनिस्सारणचे पाणी सोडणाऱ्या संबंधित सोसायटीवर दंडात्मक कारवाई करावी. त्याचबरोबर अर्धवट वाहिनीचे काम करून दुर्गंधीयुक्त पाणी नाल्यात सोडणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी दादाश्री कामठे यांनी केली आहे. अन्यथा कोंढवा बुद्रुक ग््राामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे कामठे यांनी सांगितले.