पुणे : अपहरण झालेल्या तरुणाची सुटका

पुणे : अपहरण झालेल्या तरुणाची सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या 25 वर्षीय तरुणाचे भिडे हॉस्पिटलकडून म्हात्रे पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावर एका कारमधून आलेल्या पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली. बसवंत माधव गायकवाड असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी शोध घेत संबंधित तरुणाची परभणी येथून सुटका करण्यात आल्याची माहिती दिली.

याप्रकरणी बसवंत याचा मावस भाऊ शिवलिंग दिगंबर गायकवाड (वय 30,रा.चिंबळी, ता.खेड,पुणे) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनोळखी पाच ते सहाजणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 11 मार्च रोजी रात्री पावणेअकरा ते अकराच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हा अभ्यासिकेतून घरी जात होता. त्या वेळी सेनादत्त चौकातून उजवीकडे म्हात्रे पुलाकडे जात असताना, भिडे हॉस्पिटलजवळ एक पांढर्‍या रंगाची चारचाकी गाडी आली.

त्यातील पाच ते सहा अनोळखी इसमांनी जबरदस्तीने त्याला गाडीत बसवून अपहरण केले. याबाबत माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक एम. कुंभार याबाबत पुढील तपास करत आहेत.

अपहरणाचे कारण अस्पष्ट
संबंधित तरुण हा मूळचा नांदेड येथील रहिवासी असून, पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी आला होता. घटनेच्या दोन दिवस आधीच तो पुण्यात दाखल झाल्यानंतर त्याचे अचानक अपहरण करण्यात आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांच्या चौकशीत अपहरण करताना वापरलेली कार ही नांदेड येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांची दोन ते तीन पथके कार्यरत होऊन त्यांनी तरुणाची परभणी येथून सुटका केली. नेमके कोणत्या कारणाने त्याचे अपहरण करण्यात आले याचा अद्याप उलगडा झालेला नसून त्याबाबत पोलिस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news