7th Khelo India Youth Tournament : प्रणव घारे, सुरज चोरगे, परम माळी अंतिम फेरीत

Khelo India Youth Games : कुस्तीत महाराष्ट्राची तीन पदके निश्चित
Khelo India Youth Games 2025
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या लढतीतील एक क्षण.pudhari photo
Published on
Updated on

पुणे : प्रणव घारे, सुरज चोरगे व परम माळी या मराठमोळ्या मल्लांनी 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मैदान गाजवित अंतिम फेरीत धडक मारली आहे. कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्राची 3 पदके पक्की झाली आहेत.

कुस्ती आखाड्यात मराठी मल्लांनी वर्चस्व गाजवले. मुलांच्या विभागात 51 किलो गटाच्या फ्रीस्टाईल प्रकारात राधानगरीच्या प्रणव घारे याने चुरशीच्या उपांत्य लढतीत हरयाणाच्या हर्ष कुमारचा 6-4 गुण फरकाने पाडाव करीत अंतिम फेरी गाठली.

92 किलो फ्रीस्टाईल प्रकारात पुण्याच्या सुरज चोरगे याने दिल्लीच्या मिराज सिंग झोकेर याला साडेतीन मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्य लढतीत 12.0 गुणांनी लोळविले. गेल्या वर्षी उत्तराखंड येथे झालेल्या कॅडेड नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या सुरजकडून उद्या सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. पुण्यातील हनुमान आखाडा येथे प्रशिक्षक गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो.

ग्रीको रोमन प्रकारातील 80 किलो गटात परम माळी याने उपांत्य लढतीत मध्य प्रदेशच्या सिद्धार्थ जोशीचा 11-4 गुण फरकाने अवघ्या तीन मिनिटांत फडशा पाडत सुवर्णपदकाची लढत निश्चित केली. भारव्दांज डावावर सलग गुण जिंकून परमने कुस्ती गाजवली.

Khelo India Youth Games 2025
Operation Sindoor : संरक्षणावरचा खर्च हा एक प्रकारचा विमा; माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी व्यक्त केली भावना

मुलींच्या विभागातील 61 किलो फ्रीस्टाईल प्रकाराच्या उपांत्य लढतीत अकोल्याच्या शृष्टी श्रीनाथ हिला पंजाबच्या विशाखाकडून 0-4 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे तिला आता कांस्यपदकासाठी लढावे लागेल. याचबरोबर रिपॅचेसमधून ग्रीको रोमनच्या 55 किलो गटातून आदित्य तापे व 51 किलो गटात हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्राला कांस्यपदके जिंकून देण्यासाठी खेळताना दिसतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news