Former Army Chief Naravane on operation sindoor
Pune : संरक्षण खर्च हा वाया जाणारा नसून देशासाठी एक आवश्यक विमा आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला नियंत्रण रेषेपलीकडे आपले गैरप्रकार रोखावे असाच असा कडक संदेश ऑपरेशन सिंदूर मधून दिला आहे.असे मत देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या हीरक महोत्सवी समारंभात बोलताना व्यक्त केले.
जनरल नरवणे यांनी या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूर बाबत मत व्यक्त केले.त्यानी पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधा आणि हवाई तळांवर भारताच्या धोरणात्मक हल्ल्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, या कृतींमुळे पाकिस्तानला आक्रमकतेच्या मार्गावर चालत राहण्याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे दिसून आले, ज्यामुळे शेवटी दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) शत्रुत्व संपवण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली.
ते म्हणाले, "गेला आठवडा अशांत होता, त्याची सुरुवात ऑपरेशन सिंदूरपासून झाली ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये लष्करी कारवाई सुरू केली.संरक्षणावर खर्च करायचा की शिक्षणावर, आरोग्यसेवा आणि स्वच्छतेवर किती खर्च करायचा? यावर बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे.मात्र संरक्षणावर केलेला खर्च हा वाया जाणारा नसून देशासाठी एक आवश्यक विमा आहे.
चांगली तयारी असलेले सैन्य संघर्ष टाळण्यास मदत करते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देते. युद्ध महाग असते आणि त्याचे परिणाम आणखी महाग असतात. म्हणूनच, राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा गुंतवणूक अत्यंत महत्त्वाच्या आहेत.