Khed Civil Engineer Attack: खेडमध्ये सिव्हिल अभियंत्यावर पाच जणांचा हल्ला; दुचाकीची धडक झाल्याचे सांगून गाडीतून उतरवले

खेड तालुक्यातील गोसासी येथे दुचाकीची धडक झाल्याचे सांगून सिव्हिल अभियंत्याला गाडीतून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर पाच जणांनी काठी आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केल्याची तक्रार खेड पोलिसांत दाखल झाली आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

राजगुरुनगर: तुमच्या गाडीला माझ्या दुचाकीची जोरात धडक बसली असुन तुम्ही खाली उतरून तुमच्या गाडीचे नुकसान पहा असे म्हणत एका सिव्हिल अभियंत्यावर दुचाकीस्वारांनी करून जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

राजगुरुनगर ते पाबळ रस्त्यावर गोसासी, ता. खेड गावाच्या हद्दीत बुधवारी (दि १६) सायंकाळी हा प्रकार घडला असुन त्यावरून मयुर मच्छिंद्र रामाणे , वय ३०, रा. वाफगाव, ता. खेड या अभियंत्याने खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेजजवळ हल्लेखोरांनी त्याला गाडीतून खाली उतरवण्यासाठी खोटी सबब सांगितली होती.

Crime News
Bhandarkar Institute Pune: देशभरातील पुरातन हस्तलिखितांसह पोथ्यांचे डिजिटायझेशन पुण्यात

फिर्यादी रामाणे हे सायंकाळी सुमारे ५.५० वाजता स्वतःची स्विफ्ट कार चालवत होते. त्यावेळी पाठीमागून नंबर प्लेट कपड्याने झाकलेली स्प्लेंडर मोटारसायकल आली. त्यावर दोन अनोळखी इसम बसलेले होते. पुढील इसमाने काळ्या रंगाचे जर्किन घातलेले होते, तर मागील इसमाने तोंडाला मास्क लावलेला होता.

पुढील इसमाने अभियंत्याला सांगितले की, “माझ्या दुचाकीची तुमच्या गाडीला मागून धडक बसली आहे. गाडीचे पाठीमागून खूप नुकसान झाले आहे. तुम्ही खाली उतरून पहा.” ही गोष्ट ऐकताच अभियंता गाडीतून उतरला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या मोटारसायकलवरील तीन अनोळखी इसम (सर्वांनी तोंडाला मास्क लावलेला होता) यांच्यासह एकूण पाच जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

Crime News
Purandar Farmer Crisis: ढगाळ वातावरणामुळे मक्यावर अळी; औषध फवारणीचा खर्च वाढला

हल्लेखोरांनी काठीने पाठीवर व दोन्ही पायांच्या पोटरीवर मारहाण केली. तसेच हातात लपवुन आणलेल्या कोयत्याच्या उलट्या बाजूने कपाळावर व डाव्या हाताच्या कोपरावर वार केले. या हल्ल्यात अभियंत्याचा हातातील मोबाइल फुटला. तसेच त्याच्याकडील ४.१ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीही पडून गहाळ झाली.

फिर्यादीच्या तक्रारीतील संशया नुसार, हे पाच अनोळखी इसम चांडोली येथील त्याच्या पुर्वी वाद असलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हल्ला करण्यासाठी आले होते. दोन्ही मोटारसायकलींच्या नंबर प्लेट कपड्याने झाकलेल्या असल्याने नंबरही समजू शकले नाहीत. पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news