

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरातील स्वयंभू श्री खंडोबा व म्हाळसा-देवीच्या शिवलिंगांना चंदनउटीचा लेप लावण्यात आला. उन्हाळ्यामुळे सर्वत्र तप्त वातावरण असून, उष्ण लहरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जेजुरीतील श्री खंडोबा मंदिरात मूर्तींना व स्वयंभू लिंगाला शीतलता निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी चंदनउटीचा लेप दिला जातो. दुपारच्या नित्यपूजेच्या वेळी खंडोबा मंदिरात पुजारी सेवकवर्ग, ग्रामस्थ व भाविकांनी चंदनउटीची पूजा केल्याचे पुजारी सेवक वर्गाचे गणेश आगलावे यांनी सांगितले.