Khadakwasla Water Cut: खडकवासला प्रकल्पाच्या रब्बी आवर्तनावर पाणीकपातीचे सावट; ४५ दिवसांआधीच पाणी बंद होण्याची शक्यता

शासनाचे १० टक्के पाणीकपातीचे निर्देश; चार धरणांत ८७.१८ टक्के साठा, आतापर्यंत १.९० टीएमसी पाणी वितरित
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्य शासनाने पाणीसाठ्यातून १० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिल्याने खडकवासला साखळी प्रकल्पातील रब्बी हंगामाचे आवर्तन निर्धारित ४५ दिवसांपूर्वीच थांबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Khadakwasla Dam
Maharashtra School Admission Age Limit: शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे अनिवार्य

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सध्या २५.४२ टीएमसी (८७.१८ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी २९.०४ टीएमसी (९९.६० टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ३.६२ टीएमसी पाणी कमी आहे. त्यातच पाणीकपातीचे निर्देश आल्याने शेतीसाठी सुरू असलेल्या आवर्तनावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

Khadakwasla Dam
Khadakwasla Project Summer Water Rotation: खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन बंद; अडीच लाख हेक्टर शेतीला फटका

खडकवासला साखळी प्रकल्पातून बारामती, इंदापूर, दौंड आणि हवेली तालुक्यांतील शेती तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. यंदा रब्बी हंगामासाठी २५ सप्टेंबरपासून आवर्तन सुरू केले आहे. हे आवर्तन ४५ दिवस चालवण्याचे नियोजन आहे. दररोज ११०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. या आवर्तनातून चार टीएमसी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

Khadakwasla Dam
Pune Graduate Teacher Constituency Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची भाजपला ताकद; डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंसाठी महायुतीचा निर्धार

आत्तापर्यंत १.९० टीएमसी पाणी वितरित

जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत १.९० टीएमसी पाणी संबंधित चार तालुक्यांतील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वितरित केले आहे. नियोजनानुसार पहिल्या आवर्तनासाठी चार टीएमसी पाणी देण्याचे उद्दिष्ट असल्याने अद्याप २.१० टीएमसी पाणी वितरित करणे बाकी आहे. मात्र, राज्य शासनाच्या १० टक्के पाणीकपातीच्या निर्देशांमुळे उपलब्ध पाण्याच्या नियोजनात बदल करावा लागू शकतो. परिणामी, उर्वरित पाण्यापैकी १ टीएमसी पाणीकपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणीकपातीचा निर्णय आणि उपलब्ध साठ्याचा विचार करता सध्या सुरू असलेले आवर्तन पूर्ण ४५ दिवस चालेल, की त्यापूर्वीच बंद करावे लागेल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आवर्तनाचा कालावधी कमी झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना आवश्यक असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या पुढील निर्णयाकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Khadakwasla Dam
Jadhavwadi Leopard Captured: आंबेगाव तालुक्यात जाधववाडीत नर बिबट्या जेरबंद; गार ओढा, सुंदरमळा परिसरात भीती कायम

पावसाळ्यात १९ टीएमसी पाण्याचा विसर्ग

यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला साखळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिरिक्त पाऊस झाल्याने मुठा नदीतून १९ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याच कालावधीत कालव्याद्वारेही पाणी सोडण्यात आले होते. रब्बीचे आवर्तन सुरू होण्यापूर्वीच ६.३८ टीएमसी पाणी कालव्याद्वारे वितरित करण्यात आले होते. बारामती, इंदापूर, दौंड आणि हवेली तालुक्यांतील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने या पाण्याचा खरिपातील पिकांना फायदा झाला. आता रब्बी हंगामातही पिकांना वेळेत पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र, धरणांतील साठा आणि शासनाच्या पाणीकपातीचे निर्देश, यामुळे शेतीसाठीच्या आवर्तनाचे नियोजन आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news