पुणे : खडकवासला, किरकटवाडी स्मशानभूमीची होणार दुरुस्ती

पुणे : खडकवासला, किरकटवाडी स्मशानभूमीची होणार दुरुस्ती

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला व किरकटवाडी येथील स्मशानभूमीची दुरुस्ती, सुशोभीकरणाची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमी अपुरी पडत असल्याने विस्तार करण्याबाबत महापालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. खडकवासला येथील स्मशानभूमीत पाणी साठत असल्याने तसेच काही ठिकाणी दुरवस्था झाल्याने नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. याकडे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र ओबीसी आघाडीचे संघटक सचिव दत्तात्रय कोल्हे यांनी लक्ष वेधले होते.

तसेच किरकटवाडी येथील स्मशानभूमीत पुरेशा सुविधा व अंतर्गत दुरुस्तीबाबत माजी उपसरपंच नरेंद्र हगवणे व खडकवासला मनसेचे उपाध्यक्ष रमेश करंजावणे यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते यांनीही खडकवासला भागातील स्मशानभूमींच्या दुरवस्थेबाबत आयुक्तांना निवेदन दिले आहे. कोल्हे म्हणाले की, ग्रामपंचायत काळात स्मशानभूमीची आवश्यक दुरुस्ती केली जात होती. मात्र, महापालिकेकडे कारभार गेल्यापासून दुर्लक्ष झाले आहे. स्मशानभूमींच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या खडकवासला, किरकटवाडीसह सर्व गावांतील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यात पूर्वी सर्व स्मशानभूमींची आवश्यक दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमी अपुरी पडत असलेल्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास स्मशानभूमीचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत भवन विभागाला पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news