Khadakwasla Dam: खडकवासलातून विसर्ग बंद; धरणसाखळीत 78.52 टक्के पाणीसाठा

शनिवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 22.89 टीएमसी म्हणजे 78.52 टक्के साठा झाला होता.
khadakwasla Dam
खडकवासलातून विसर्ग बंद; धरणसाखळीत 78.52 टक्के पाणीसाठाFile Photo
Published on
Updated on

खडकवासला: पानशेत - वरसगावसह चारही धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात होणारी पाण्याची आवक जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे शनिवारी (दि. 19) सायंकाळी सहा वाजता खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रातील विसर्ग बंद करण्यात आला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 22.89 टीएमसी म्हणजे 78.52 टक्के साठा झाला होता.

शनिवारी सकाळपासून पावसाळी वातावरण आहे. ढग दाटून आले होते. मात्र, खडकवासला, टेमघरच्या काही भागात मात्र तुरळक पावसाचा अपवाद वगळता दिवसभर पावसाने उघडीप दिली. धरणसाठ्यात गेल्या 24 तासांत 0 .08 टीएमसी इतक्या अल्पशा पाण्याची भर झाली. धरणक्षेत्रातील ओढे, नाले, नद्यांचे प्रवाह मंदावले आहेत. (Latest Pune News)

khadakwasla Dam
Garbage Issue: 'स्वच्छ'कडून सोसायट्यांचा कचरा उचलण्यास दिरंगाई; महिन्याचे पैसे भरूनही नागरिकांना मनस्ताप

अनेक ओढ्यांचे प्रवाह आटले आहेत. शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 22.81 टीएमसी पाणी होते. शनिवारी दिवसभरात टेमघर येथे 5 व खडकवासला येथे 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पानशेत, वरसगाव येथे पाऊस पडला नाही. गेल्या वर्षी 19 जुलै रोजी धरणसाखळीत 12.22 टीएमसी म्हणजे 41.97 टक्के साठा होता.

खडकवासला धरणसाखळी

एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी

शनिवारचा पाणीसाठा

22.89 टीएमसी (78.52 टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news