Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत ८७.६३ टक्के पाणीसाठा; आवक मंदावल्याने मुठा नदीतील विसर्ग बंद

अतिवृष्टीनंतर धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; चारही धरणांमध्ये २५.५४ टीएमसी पाणी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: पानशेत-मुठा-मोसे खोऱ्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर रविवारी दुपारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक शनिवारपेक्षा (दि. २५) कमी झाली. रविवारी सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरणसाखळीत २५.५४ टीएमसी म्हणजेच ८७.६३ टक्के पाणीसाठा झाला होता. दरम्यान, पाण्याची आवक मंदावल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत केला जाणारा विसर्ग रात्री ११ वाजता पूर्णपणे थांबविण्यात आला.

Khadakwasla Dam
Pune Public Toilets Cleanliness Problem: ‘स्वच्छ पुणे’चा दावा फोल? सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेने नागरिक त्रस्त

मागील पाच दिवस पडलेल्या अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत धरणसाखळीत जवळपास एक टीएमसीची भर पडली. शनिवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत २४.५६ टीएमसी साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत ०.७० टीएमसी अधिक साठा आहे. गेल्या वर्षी २६ जुलै २०२५ रोजी धरणसाखळीत २४.८४ टीएमसी (८५.२० टक्के) पाणी होते. रविवारी दिवसभरात टेमघर येथे ३६ ,पानशेत येथे ९, वरसगाव येथे ५ आणि खडकवासला येथे ५ मिलिमीटर पाऊस पडला.

Khadakwasla Dam
Pune Market Yard Vegetable Prices: पावसामुळे पुणे मार्केट यार्डात भाजीपाला स्वस्त; पालेभाज्यांच्या दरातही मोठी घसरण

वरसगाव धरणाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण-मारके म्हणाल्या की, गेले पाच दिवस पडलेला जोरदार पाऊस आणि सध्याच्या रिमझिमीमुळे ओढे-नद्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. जोरदार पाऊस नसल्याने पाण्याची आवक मंदावली आहे.

Khadakwasla Dam
Pune Fruit Market Prices: पुणे फळबाजारात डाळिंबाला तेजी; मागणी वाढल्याने घाऊक दरात 10 टक्क्यांची वाढ

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग दुपारनंतर टप्प्या टप्प्याने कमी करून रात्री पूर्णपणे थांबविण्यात आला. असे असले तरी खडकवासला शंभर टक्के भरले असल्याने धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास जादा पाणी मुठा नदीत सोडले जाणार आहे. खबरदारीसाठी खडकवासला जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Khadakwasla Dam
Pune Grocery Market Prices: श्रावणपूर्वी किराणा बाजारात साखरेला गोडी; भावात पुन्हा वाढ, शेंगदाणे मात्र स्वस्त

घाटमाथ्यासह चारही धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला आहे. रिमझिम पावसासह अधूनमधून सरी कोसळत आहेत. पावसाचे ढग विरळ होऊन थोडावेळ सूर्यदर्शन होत आहे. त्यामुळे धरण खोऱ्यात शेतीची खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news