Khadakwasla Dam Water Storage: धरणसाखळीत ५७.८६ टक्के पाणीसाठा

गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत ५७.८६ टक्के साठा झाला होता.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: गेल्या पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पानशेत खोऱ्यात बुधवारी (दि.१५) पावसाची रिमझिम सुरू झाली होती. गुरुवारी (दि.१६) पानशेत-मुठा खोऱ्यात तुरळक पाऊस पडला. शनिवारपासून (दि.११) खडकवासाला धरण साखळीतील पाणीसाठा स्थिर आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत ५७.८६ टक्के साठा झाला होता.

Khadakwasla Dam
NEET 2026 Result: पुण्याची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत राज्यात प्रथम; वर्षभर मोबाईल वापरला नाही, ZP शाळेत झालंय प्राथमिक शिक्षण

दिवसभरात पानशेत येथे १४, टेमघर येथे ६ आणि वरसगाव येथे ९ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरण परिसरात मात्र कडकडीत ऊन पडले होते.

Khadakwasla Dam
Milk Production: जिल्ह्यात दूध संकलनात अचानक दोन लाख लिटरची घट; भेसळविरोधी कारवायांच्या धसक्याचा परिणाम

वरसगाव धरण जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण-मारके म्हणाल्या, की धरणसाखळीत नद्या, ओढे-नाल्यांतून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. खडकवासला वगळता इतर तिन्ही धरणक्षेत्रांत पावसाळी वातावरण आहे. मात्र, अपेक्षित पाऊस पडत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news