Khadakwasla Water Release: पुण्यात पाण्याचा वापर कुठे? खरीप पिकांसाठी धरणातून पाणी सोडले; महापालिकेचा जलसंपदाला सवाल

उभी पिके करपू नयेत म्हणून पाणी सोडल्याचे जलसंपदा विभागाचे स्पष्टीकरण; पुणेकरांकडून पाणी बचतीची भूमिका
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: उभी पिके जळू नयेत, करपून जावू नयेत, यासाठी खरीप हंगामाच्या सिंचनासाठी कालवा सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे पाणी सोडण्यात आल्याचा दावा खडकवासला साखळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकाराच्या आदेशानुसार पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे, असे सूतोवाच त्यांनी केले.

पाण्याचे गंभीर संकट राज्यावर आले असताना पुण्यात मात्र, परिस्थिती बरी आहे. त्यामुळे हे पाणी जास्त प्रमाणात सोडू नये, अशी भूमिका पुणेकरांची आहे. त्यामुळे धरणातील पाणी का सोडले जात आहे. यावरून महापालिकेने जलसंपदाला हे पाणी का सोडत आहात, असा जाब विचारणारे पत्र पाठविले आहे. यावर ‘उभी पिके करपून जाऊ नये म्हणून हे पाणी सोडले’ असे कारण जलसंपदा विभागाने दिले आहे.

Khadakwasla Dam
Supriya Sule: बारामतीतील घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंची पोलिस अधीक्षकांची भेट; पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी

जलसंपदाने याबाबत दिलेली कारणे

१६ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे धरणे तुंडुंब भरल्याने तसेच खरीप आवर्तन यामुळे कालवा आणि नदीमध्ये पाणी सोडावे लागले.

१६ जुलै ते २४ सप्टेंबर या कालावधीत ६.५ टीएमसी पाणी उभी पिके सुकू नयेत, तसेच जिल्ह्यातील तालुक्यांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कालव्यातून पाणी सोडले.

खडकवासला साखळी प्रकल्पात १ ऑक्टोबर रोजी सायकाळी साडेपाच वाजेपर्यंत २७.४० टीएमसी पाणीसाठा तर याच दरम्यान मागील वर्षी २९.१५ टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षीपेक्षा सुमारे दोन टीएमसीने पाणीसाठा कमी झाला आहे.

Khadakwasla Dam
Fursungi Tobacco Factory: घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! मध्य प्रदेशातील कामगार अटकेत; मालक पसार

गेल्या चार वर्षांत सष्टेंबर महिन्यात कालव्यातून सोडलेले पाणी

  • १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६

  • १ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२५

  • १ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२४

  • १ सप्टेंबर ते ३० सप्‍टेंबर २०२३

महापालिकेने पाण्याबाबत दिलेला प्रस्ताव जलसंपदा विभागाला मिळालेला आहे. मात्र, सध्या निवडणुकीमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यास काही बंधने आहेत. दरम्यान, धरणामधील पाणीसाठा आणि त्याचे पाणी वाटप कसे करायचे, याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे.

- प्रवीण कोल्हे, अधिक्षक अभियंता, खडकवासला पाटबंधरे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news