पुणे: मुठा पात्रात वाढला विसर्ग

पुणे: मुठा पात्रात वाढला विसर्ग

किरकटवाडी, पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरण भरल्यामुळे काल मध्यरात्रीपासून मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या जलाशयात वेगाने पाणी जमा होत असल्याने मंगळवारी दुपारी धरणाचे सर्व दरवाजे उघडून नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतील एकूण पाणीसाठा 40 टक्के झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी रात्री बारा वाजता खडकवासलाचा 16 नंबरच्या मोरीचा दरवाजा एक फुटाने उचलून 856 क्युसेकने प्रवाह सुरू केल्याचे अधिकारी योगेश भंडलकर यांनी सांगितले.

रात्रभर कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी सहा वाजता धरणाचे तीन दरवाजे एक फुटाने उघडून 2568 क्युसेक करण्यात आला. हा प्रवाह सकाळी दहा वाजता आणखी एक दरवाजा एक फुटाने उघडून 3,424 क्युसेक करण्यात आला. दुपारी बारा वाजता सात दरवाजे एक फुटाने उघडून 5,992 क्युसेक करण्यात आलेला प्रवाह एक वाजता सर्व दरवाजे उघडून 11,900 क्युसेक करण्यात आला. त्यानंतर रात्री आठ वाजल्यापासून 13,142 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्रातून सोडण्यात येणाऱ्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यत असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले दहा दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. साखळीतील पाणीसाठा 8 टक्क्यांपर्यंत खालावला होता, तो आता वाढून चाळीस टक्के झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news