Khadakwasla Dam Rainfall: खडकवासला धरणक्षेत्रात मान्सूनचे आगमन; वरसगाव-पानशेतमध्ये दमदार पाऊस

धरणसाखळीत पाणीसाठा १३ टक्क्यांवर; पुणेकरांना दिलासा, मात्र ओढे-नाल्यांत प्रवाह सुरू होण्याची प्रतीक्षा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: गेल्या दोन आठवड्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर मंगळवारी (दि. २३) रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत खोऱ्यातील घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात दमदार हजारी लावली. दिवसभरात वरसगाव येथे १८, तर पानशेत येथे १७ मिलिमीटर पाऊस पडला. खडकवासला धरणमाथ्यावर दिवसभरात पावसाची नोंद झाली नाही, तर टेमघर येथे ४ मि.मी. पाऊस पडला.

Khadakwasla Dam
Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपातीचा फटका; टँकरवर अवलंबून सोसायट्यांचे अर्थकारण कोलमडले

सिंहगडच्या पश्चिम खोऱ्यासह पानशेत, मुठा, मोसे, शिरकोली, दापसरे, धामण ओहोळ खोऱ्यात सायंकाळी पावसाची रिपरिप सुरु होती. धरणक्षेत्रातील मान्सूनच्या दमदार आगमनामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत ३.८४ टीएमसी म्हणजे केवळ १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत अल्प पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी धरणसाखळीत ३५. ८३ टक्के पाणीसाठा होता.

Khadakwasla Dam
Maharashtra Monsoon Update : मान्सून गतिमान! दिवसात ८० टक्के महाराष्ट्र व्यापला, ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा

धरणक्षेत्रात प्रथमच पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरत आहे. अद्याप ओढे-नाले-नद्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू झाले नाहीत. त्यामुळे धरणसाठ्यात भर पडण्यास सुरुवात झाली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठ्यात दोन दिवसांत मंदगतीने भर पडण्यास सुरुवात होईल.

गिरिजा कल्याणकर-फुटाणे, खडकवासला धरण विभाग, शाखा अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news