Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत ९७.७८ टक्के पाणीसाठा; चार दिवसांत किरकोळ घट

पानशेत-वरसगाव खोऱ्यात तुरळक पाऊस; खडकवासला धरणाची पातळी ५२.५१ टक्क्यांवर
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

वेल्हे: मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात घाटमाथ्यासह पानशेत-वरसगाव खोऱ्यात तुरळक पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी जवळपास निम्म्याने कमी झाली असली, तरी ४ धरणांच्या खडकवासला धरण साखळीत सोमवारी (दि. २१) सायंकाळी ५ वाजता २८.२१ टीएमसी म्हणजे ९७.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

Khadakwasla Dam
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात मुलाखतीसह १० हजार शिक्षकांची भरती सुरू होणार; मुलाखतीसाठी आता केवळ १० गुण

सोमवारी दिवसभरात खडकवासला व वरसगाव येथे प्रत्येकी ३ मिलिमीटर, तर पानशेत येथे २ मिलिमीटर इतक्या अल्प पावसाची नोंद झाली. गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत-वरसगाव धरण खोऱ्यात तुरळक पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस नसल्याने धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक जवळपास बंद झाली असून, धरण साखळीतील पाणीसाठ्यात मंदगतीने घट होत आहे.

Khadakwasla Dam
Maharashtra Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के मदत करावीच लागेल; ३० सप्टेंबरनंतर सरकार निर्णय घेणार: कृषिमंत्री भरणे

गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साखळीत जवळपास एक टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी २१ सप्टेंबर २०२५ रोजी धरण साखळीत २९.१२ टीएमसी म्हणजे ९९.८९ टक्के पाणीसाठा होता. पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. खडकवासला धरणातून शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी १ हजार ६७६ क्युसेक पाणी सोडले जात असल्याने धरणाच्या साठ्यात घट सुरू आहे. खडकवासला धरणाची पातळी १.०४ टीएमसी म्हणजे ५२.५१ टक्क्यांवर आली आहे. तसेच, वरसगाव धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून खडकवासला धरणात ६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Khadakwasla Dam
Rhino Conservation India: रेडिओ चिप अन् जीपीएस ट्रॅकिंगमुळे गेंड्यांना संरक्षण; भारतात संख्या ३,३२३ वर

तुरळक पावसामुळे धरण साखळीतील पाणीसाठा १८ सप्टेंबरपासून जवळपास स्थिर आहे. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता धरण साखळीत ९६.८७ टक्के पाणीसाठा होता. ४ दिवसांत धरण साखळीत ०.०९ टीएमसी इतकी किरकोळ घट झाली आहे.

सोमवारचा पाणीसाठा धरण टीएमसी टक्केवारी

  • खडकवासला १.०४ ५२.५१

  • पानशेत १०.६५ १००

  • वरसगाव १२.८२ १००

  • टेमघर ३.७१ १००

Khadakwasla Dam
Devendra Fadanvis: पुणे बनेल देशातील प्रमुख GCC हब; ४०० नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, चार लाख रोजगारांचे लक्ष्य

एक-दोन जोरदार पाऊस पडल्यास पाण्याची तूट भरून धरण साखळी पुन्हा १०० टक्के भरणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसा साठा शिल्लक राहण्यास मदत होणार आहे.

वीरेश राऊत, शाखा अभियंता, खडकवासला धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news