Rhino Conservation India: रेडिओ चिप अन् जीपीएस ट्रॅकिंगमुळे गेंड्यांना संरक्षण; भारतात संख्या ३,३२३ वर

शिकारीच्या हालचालींवर वनरक्षकांची नजर; काझीरंगासह देशातील गेंडा संवर्धनाला तंत्रज्ञानाची साथ
Rhino
RhinoPudhari
Published on
Updated on

पुणे: भारतात गेंड्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेडीओ चीप आणि जीपीएस ट्रॅकिंग हे तंत्रज्ञान प्रभावी ठरले आहे. देशात एकेकाळी नामशेष होणाऱ्या गेंड्याच्या शिकारीचे प्रमाण नगण्य झाल्याचा दावा सरकारी आकडेवारी सांगते. आजघडीला भारतात एकशिंगी गेंड्यांची संख्या दोन हजारांवरून तीन हजार ३२३ इतकी झाली आहे.

Rhino
Devendra Fadanvis: पुणे बनेल देशातील प्रमुख GCC हब; ४०० नवीन ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, चार लाख रोजगारांचे लक्ष्य

जगात दरवर्षी २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक गेंडा दिन म्हणून साजरा केला जातो, या निमित्ताने त्याच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम करण्याचा संकल्प केला जातो. पूर्वी विविध प्रांतातील राजे आणि त्यानंतर ब्रिटीश काळात गेंड्यांची शिकार हा मनोरंजनाचा प्रकार बनला होता. त्या काळातच गेंड्यांची खूप मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. सन १९०० मध्ये केवळ २०० गेंडे भारतात उरले होते. त्यानंतर त्यांच्या संवर्धनावर काम सुरू झाले. त्यानंतर हा आकडा दोन हजारांवर गेला. आज ती संख्या तीन हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

Rhino
Pune Ganeshotsav Infection Risk: गणेशोत्सवाच्या गर्दीत संसर्गाचा धोका; पुण्यात डेंग्यू-चिकुनगुनियासह फ्लूचे रुग्ण वाढले

रेडीओ चिप कशी बसवतात, फायदे काय?

  • गेंड्यांच्या शिंगामध्ये ड्रिलिंग केले जाते. त्यामध्ये लहान आकाराची रेडीओ चिप किंवा जीपीएस ट्रॅकर बसवला जातो.

  • काही वेळा गेंड्यांच्या गळ्यात किंवा पायात आधुनिक सेन्सर्स असलेले 'स्मार्ट कॉलर' बसवले जातात, जे थेट सॅटेलाईट किंवा स्थानिक रेडीओ नेटवर्कशी जोडलेले असतात.

  • या चिप्स वन्यजीव रक्षकांना गेंड्यांचे अचूक भौगोलिक स्थान दिवसातून अनेकवेळा थेट दाखवतात.

  • आधुनिक चिप्समध्ये प्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे खास अल्गोरिदम असतात. गेंडा धावत आहे, विश्रांती घेत आहे की, आजारी आहे, याची माहिती याद्वारे मिळते.

Rhino
Maharashtra Sports Cash Prize: ऑलिम्पिक सुवर्णविजेत्यांना आता ५ कोटींचे बक्षीस; महाराष्ट्र सरकारचा खेळाडूंसाठी मोठा निर्णय
  • जर एखादा गेंडा नेहमीपेक्षा जास्त गतीने पळू लागला किंवा सहा तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी पडून राहिला तर अभयारण्याच्या कक्षात स्वयंचलित लाल रंगाचा आणीबाणीचा अलार्म वाजतो.

  • अलार्म वाजताच वनरक्षक थेट घटनास्थळी वेळेत पोहोचू शकतात. ज्यामुळे शिकार होण्यापूर्वीच गेंड्याचा जीव वाचवता येतो.

  • एखाद्या गेंड्याची शिकार झालीच, तरी शिंगात लपवलेल्या चिपच्या आधारे मागोवा घेऊन शिकारी आणि तस्करी करणाऱ्या टोळ्यांना पकडणे सोपे जाते.

  • शिकारी या चिप्स ट्रॅक करू नयेत म्हणून 'सिगफॉक्स' किंवा 'लोरा' सारख्या प्रगत आणि सुरक्षित खासगी रेडीओ नेटवर्कचा वापर केला जातो. ज्याचे सिग्नल डिकोड करणे शिकाऱ्यांना अशक्य असते.

  • या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतातील काझीरंगा तसेच आफ्रिकेतील जंगलांमध्ये गेंड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शिकारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करण्यात यश आले आहे.

Rhino
Pune Ganeshotsav Street Plays: गणेशोत्सवाच्या गर्दीत घुमतोय ‘ऐका हो ऐका...’; पथनाट्यातून सामाजिक प्रबोधनाचा जागर

भारतातील गेंड्यांची राज्यनिहाय आकडेवारी

  • आसाम: ३,२६० (यात सर्वाधिक संख्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात २,६०० गेंडे आहेत.)

  • उत्तर प्रदेश: ५३

  • पश्चिम बंगाल: १०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news