Devichand Agrawal Death: केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन; नातवासाठी न्यायाची लढाई लढणारा आवाज हरपला

केतन अग्रवाल प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची सातत्याने मागणी; कँडल मार्चमध्येही घेतला होता सक्रिय सहभाग
Devichand Agrawal Death
Devichand Agrawal DeathPudhari
Published on
Updated on

पुणे: केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल (वय ७१) यांचे शनिवारी सायंकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच त्यांच्या निधनामुळे अग्रवाल कुटुंबावर पुन्हा शोककळा पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Devichand Agrawal Death
Pune Crime: यवत हादरले! पिस्तुलाचा धाक दाखवून 23 वर्षीय तरुणीचे अपहरण

केतन अग्रवाल याच्या मृत्यूने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर केतनला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी देवीचंद अग्रवाल यांनी सातत्याने भूमिका मांडली. गेल्याच आठवड्यात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कँडल मार्चमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी यात जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

Devichand Agrawal Death
PM Poshan Scheme Online System: पीएम पोषण योजना पूर्णपणे ऑनलाइन; शाळांमध्ये डिजिटल नोंदींचा नवा आदेश

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना असा परिवार आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा परिस्थितीत आपल्या नातवासाठी न्यायाची लढाई लढणारे देवीचंद अग्रवाल यांचे निधन झाल्याने अग्रवाल कुटुंबावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news