Siya Goyal Parents: 'सियालाही किल्ल्यावरून ढकलून द्या'; केतन हत्या प्रकरणात सिया गोयलच्या आई-वडिलांची भावनिक प्रतिक्रिया

Siya Goyal Parents Statement: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रथमच सिया गोयलच्या आई-वडिलांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.
Siya Goyal Parents Statement
Siya Goyal Parents StatementPudhari
Published on
Updated on

Siya Goyal Parents Statement: पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच प्रथमच मुख्य आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुलगी दोषी ठरल्यास तिलाही कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

गोव्यातील लग्नसमारंभात जुळले होते नाते

सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी सांगितले की, केतन आणि सियाचे लग्न कोणत्याही मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरून ठरले नव्हते. गोव्यातील एका कौटुंबिक लग्नसमारंभात केतनच्या कुटुंबीयांनी सियाला पाहिले आणि तेथूनच दोन्ही कुटुंबांमध्ये विवाहाबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर परस्पर संमतीने साखरपुडा निश्चित करण्यात आला.

'चेतनबद्दल काहीच माहिती नव्हती'

प्रवीण गोयल यांनी सांगितले की, चेतन चौधरी आणि सियामधील संबंधांबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. जर याबाबत आधी कल्पना असती, तर त्यांनी हे लग्न कधीच मान्य केले नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'आमची चूक असेल तर आम्हालाही शिक्षा द्या'

सियाच्या आई-वडिलांनी तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त करत, "जर तपासात आमची किंवा आमच्या कुटुंबाची कोणतीही चूक आढळली, किंवा आम्हाला याची पूर्वकल्पना असल्याचे सिद्ध झाले, तर आम्हालाही कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी," अशी भूमिका मांडली. "आमची चूक असेल तर आम्हालाही फाशी द्या," असे त्यांनी भावनिक स्वरात म्हटले.

'सिया दोषी ठरली तर तिलाही कठोर शिक्षा व्हावी'

मुलीबाबत बोलताना त्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. "जर सिया दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले, तर तिलाही कायद्यानुसार सर्वात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. तिने हा गुन्हा केला असेल, तर ज्या लोहगड किल्ल्यावरून केतनचा मृत्यू झाला, त्याच ठिकाणी तिलाही नेऊन ढकलून द्या," असे त्यांनी संताप आणि दुःख व्यक्त करत म्हटले.

Siya Goyal Parents Statement
Ketan Agarwal Murder Case: 'प्लॅन A' फसला तर सियाकडे 'प्लॅन B' तयार होता; केतन अग्रवाल प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा

'केतन आम्हाला मुलापेक्षाही जवळचा झाला होता'

प्रवीण गोयल यांनी सांगितले की, केतन त्यांच्या घरी आला की त्यांना पापाजी म्हणून हाक मारायचा. तो घरच्यांमध्ये अगदी मिसळून जायचा आणि सर्वांशी आपुलकीने वागत असे. हळूहळू तो त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्यच बनला होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यावर केवळ एका तरुणाचा मृत्यू झाला नाही, तर दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेले नातेही तुटले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

तपासात नवे दावे

दरम्यान, पोलिसांच्या तपासानुसार १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर घडलेल्या घटनेत सिया गोयलने इशारा दिल्यानंतर तिचा प्रियकर चेतन चौधरी याने केतन अग्रवालला दरीत ढकलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात सिया आणि चेतन या दोघांना अटक करण्यात आली असून, तपास सुरू आहे.

टीप: वरील आरोप हे पोलिसांच्या तपासावर आधारित आहेत. अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news