Ketan Agarwal Case: सोनमच्या चुकांमधून सिया शिकली... राजा रघुवंशी प्रकरणाचा केला डीप रिसर्च; पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Case
Ketan Agarwal Casepudhari
Published on
Updated on

Ketan Agarwal Case: पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणी सिया गोयलची पोलीस कसून चौकशी करत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून ती सतत हेडलाईनमध्ये आहे. सियाने लोहगडावरून केतनला कसं ढकलून मारलं यांच्या थेअरीचा पोलीस तपास करत आहेत. जसजसा तपास पुढे जात आहे तसतसा या प्रकरणात धक्कादायक गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. पुणे पोलिसांच्या तपसात राजा रघुवंशी आणि केतन अग्रवाल प्रकरणाच्या तार जुळताना दिसत आहेत.

Ketan Agarwal Case
Chetan Agrawal Case: केतन हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट येणार...? सियाच्या भावासह आई वडील देखील पोलिस चौकशीच्या फेऱ्यात

या दोन्ही प्रकरणांमध्ये आपल्या जोडीदाराला उंच कड्यांवरून दरीत ढकलून देण्याचा पॅटर्न समान आहे. पोलीस सिया गोयलची आणि त्या बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी सोनम रघुवंशी प्रकरणाचा सखोल अभ्यास केल्याची शक्यता वर्तवत आहेत. त्यांनी सोनम प्रकरणातील चुकांमधून शिकून या घटनेला मुर्त रूप दिल्याचा संशय पोलिसांना आहे.

Ketan Agarwal Case
Ketan Murder Case: केतन हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट! साखरपुड्यापूर्वी चेतनसोबत उदयपूर ट्रिप, शॉपिंगसाठी घेतले 1 कोटी?

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुणे पोलिसांनी सांगितलं की, दोन्ही प्रकरणांमध्ये भरपूर साधर्म्य आहे. गुन्हेगारी मानसिकता, अत्यंत शिताफीने केलेलं प्लॅनिंग, थंड डोक्यानं मारण्याचा उद्येश या सर्व बाबी दोन्ही गुन्ह्यात एकसारख्याच आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा गुन्हा हतबलतेतून करण्यात आला आहे. वैयक्तिक नाती आणि तिची विचार करण्याची पद्धत यामुळं तिला केतनला मारण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता असं वाटत. तसेच दोन्ही कुटुंबामधील झालेले आर्थिक व्यवहार याची देखील सियाने हे पाऊल उचलण्यामध्ये मोठी भूमिका आहे.

Ketan Agarwal Case
Ketan Agrawal Case: सिया अन् चेतन सुटणार... केतनच्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच नाही; पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान?

सिया या निर्णयापर्यंत येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. कुटुंब आणि सामाजिक धारणा या दोन गोष्टी नक्कीच महत्वाच्या आहेत. मात्र त्याच्यापलीकडे जाऊन तपासात असं सुचित होतं आहे की अजून काही फॅक्टर्सचे कॉम्बिनेशन देखील सियाला केतन अग्रवलला मारण्यासाठी ट्रिगर करतात.

पोलिसांना सियाने सोनम रघुवंशी केसच्या सर्व बातम्या डिटेलमध्ये स्टडी केल्या असणार असा विश्वास आहे. राजा रघुवंशीला देखील ट्रेक दरम्यान एका उंच कड्यावरून ढकलून देऊन त्याचा खून करण्यात आला होता.

केतन अग्रवाल प्रकरणात केतनला सिया आणि चेतन या दोघांनीही ढकलेलं असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण लोहगडावरील तो स्पॉट असा आहे जिथून फक्त सिया केतनला व्यवस्थित खाली ढकलू शकली नसती.

विशेष म्हणजे पोलिसांनी सियाच्या मोबाईल फोनच्या ब्राऊजिंग हिस्ट्रीमधून तिने राजा रघुवंशी हत्याकांडाचा डिटेल रिसर्च केल्याचं दिसून येतं. हे हत्याकांड मेघालयात घडलं.

एवढंच नाही तर सियाने पोलीस कस्टडीमध्ये महिलेला मारहाण करतात का आणि पोलीस कोठडीत महिलांचे काय अधिकार असतात याबाबत देखील सर्च केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news