Pune Keshavnagar Kharadi River Bridge Work: केशवनगर-खराडी नदीपात्र पुलाचे काम वेगाने; मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार

मुंढवा-खराडी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुलाचे काम रात्रंदिवस; पालिकेचा मार्च 2026 पूर्णता लक्ष्य
Keshavnagar Kharadi River Bridge
Keshavnagar Kharadi River Bridge Pudhari
Published on
Updated on

मुंढवा: केशवनगर ते खराडी या नदीपात्रावरील पुलाचे काम वेगाने सुरू आहे. मागील दीड महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याठिकाणी पाहणी करून या पुलाचे काम 15 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सध्या काम वेगाने सुरू असून, 30 मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Keshavnagar Kharadi River Bridge
Pune MPDA Action Illegal Liquor: हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए; थेट ऑर्थर रोड कारागृहात रवानगी

मुंढवा ते खराडी या मुख्य रस्त्यावर नदीपात्रावर असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यावर पर्याय म्हणून केशवनगर-खराडी या दुसऱ्या एका नदीपात्रावरील पुलाचे नियोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. येथील महात्मा फुले चौकात खराडीकडून केशवनगरकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने खराडी-केशवनगर या नदीपात्रावरील नवीन पुलावरून ये-जा करू लागली तर मुंढव्यातील महात्मा फुले चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Keshavnagar Kharadi River Bridge
Pune Sawai Gandharva Bhimsen Mahotsav: आजपासून रंगणार ‘सवाई’चा स्वरयज्ञ; पुण्यात दिग्गज आणि नवोदितांचा सुरेल संगम

मागील अनेक महिन्यांपासून केशवनगर-खराडी या नदीपात्रावरील पुलाचे काम रखडले होते. या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाच्या वतीने या पुलाच्या कामाच्या ठिकाणी आंदोलन केले होते. त्या वेळी केंद्रात व राज्यात सत्ता तसेच पुण्याचे खासदार व हडपसरचे आमदारही महायुतीचे आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग््रेासला आंदोलनाची वेळ का आली, अशी उपरोधिक टीकाही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या वेळी केली होती.

Keshavnagar Kharadi River Bridge
Pune Airport Road Widening: पुणे विमानतळ रस्ता होणार कोंडीमुक्त; 24 मीटर रुंदीकरणाला वेग

त्यानंतर मुंढवा व खराडी परिसरातील वाहतूक कोंडीविषयी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दीड महिन्यापूर्वी या पुलाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली.

Keshavnagar Kharadi River Bridge
Pune Prisoners Mental Health: पुण्यातील 81 टक्के कैद्यांशी कुटुंबीयांचा संपर्क तुटला; मानसिकतेवर गंभीर परिणाम

केशवनगर-खराडी नदीपात्रावरील पुलाचे काम आम्ही वेगाने पूर्ण करत आहोत. सध्या रात्रंदिवस काम चालू आहे. मार्च 2026 अखेर या पुलाचे काम आम्ही पूर्ण करणार आहोत.

संजय धारव, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news