खेडचे प्रांताधिकारी कट्यारेंचा स्वतःला संपविण्याचा इशारा! ‘या’ नेत्यावर गंभीर आरोप

खेडचे प्रांताधिकारी कट्यारेंचा स्वतःला संपविण्याचा इशारा! ‘या’ नेत्यावर गंभीर आरोप

Published on

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे माझ्या कामात नाहक हस्तक्षेप करून मला त्रास देत आहेत. वारंवार चौकश्या आणि दबाव आणला जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या काळातही चौकशी समित्या नेमुन निवडणुक अधिकारी म्हणुन त्यात गुंतवून ठेवण्यात आले. याबाबतचा खुलासा मुख्य निवडणुक आयोगाला पत्राद्वारे केला. दरम्यान, या प्रकरणामुळे आपल्यावर मानसिक ताण राहिला. या सर्व बाबींचा उल्लेख करून त्याची चौकशी होऊन या प्रकरणाला वाचा फोडली नाही तर उद्या आपण स्वतःला संपवू  असा स्पष्ट उल्लेख करून, तसे पत्र खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी मुख्य निवडणुक आयुक्त तसेच महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले आहे.

प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कट्यारे हा अधिकारी भ्रष्टआहे, मानसिक रुग्ण आहे, तसेच ते यापूर्वी ज्या ठिकाणी काम करीत होते तेथेही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळी देखील त्याने स्वतःला संपविणार असल्याचे म्हटले होते. भ्रष्टाचार करून तो उघड होऊ लागल्यावर असे पांघरून घालायचे त्याचे प्रयत्न असतात. त्यांनी खेड तालुक्यातील पुणे रिंगरोड प्रकल्पात शेतकऱ्यांना पैसे वाटप करताना मोठा पैसा लुटला आहे. आपल्याकडे थेट पुरावे आहेत. त्यांच्याशी थेट आपला कधीही सहवास, सबंध आलेला नाही.

शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्या. तो आमदार म्हणुन माझा अधिकार आहे. ते स्वतः मला म्हणाले होते की, साडेचार कोटी रुपये देऊन ही म्हणजे खेडची जागा मिळवली आहे. शासकीय अधिकाऱ्याने बदलीसाठी कोट्यवधींची माया कुणाला व का दिली, याचीही चौकशी शासकीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली. 'दुध का दुध पाणी का पाणी होई'पर्यंत मी देखील विधानसभेत आवाज उठवणार आहे. विधानभवनासमोर उपोषण आंदोलन करणार आहे. असे आमदार मोहिते पाटील म्हणाले.

आमदार दिलीप मोहिते पाटील टार्गेट झाले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे पुण्यातील आमदार सुनिल टिंगरे यांच्यावर ड्रग अँड ड्राईव्ह प्रकरणात आरोप झाले आहेत. अशातच शासकीय अधिकाऱ्यांच्या आरोपामुळे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील टार्गेट झाले आहेत. अजित पवार यांच्या होम पिच असलेल्या पुणे जिल्ह्यात एका पाठोपाठ घडत असलेल्या घटनांमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news