पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीच्या दर्जेदार उपपदार्थांना गणेशोत्सवाच्या काळात नेहमीच्या तुलनेत मागणी वाढली. संघाच्या 200 ग्रॅम मॅप पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे मोदकांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.
एकूण 34 टक्क्यांनी विक्रीत वाढ नोंदविण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी सांगितली. याशिवाय पेढे, बर्फी, पनीर, श्रीखंड, आमखंड, बासुंदी, ग्रीनपीजच्या विक्रीतही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)
कात्रज खवा मोदक, चॉकलेट मँगो मोदक, पेढे, कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मँगो बर्फी व पान, गुलकंद व शुगर फ्री काजू कतली ही उत्पादने लोकप्रिय असून, चोखंदळ पुणेकर ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. यामध्ये सर्व मिठाई उत्पादने 250 ग्रॅम बॉक्स व 100 ग्रॅम बॉक्स पँकिंगच्या आकारात ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
कात्रज डेअरीने गणोशोत्सवामध्ये असंख्य ग्राहकांची मागणी पूर्ण केलेली आहे. याशिवाय कात्रज डेअरीची श्रीखंड, आमखंड व बासुंदी ही उत्पादने देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. कात्रज डेअरी ही पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था असून, आयएसओ 220002018ः व 140012015ः ही प्रमाणपत्रे मिळविलेली आहेत.
याबरोबरच गुणवत्ता व दर्जाबाबतचे एनडीडीबीचे क्वॉलिटी मार्क हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. डेअरीच्या दूध व उपपदार्थ विक्रीचा लाभ हा शेतकऱ्यांना होतो. आगामी दसरा व दिवाळी सणानिमित्त कात्रजच्या दर्जेदार व भेसळविरहित उत्पादनांचा आस्वाद ग्राहकांनी घेण्याचे आवाहनही ॲड. ढमढेरे यांनी केले आहे.