Kasba Peth Cleanliness Initiative: कसबा पेठेत ‘पाडू नको, आता इथे खेळू’; कचऱ्याच्या जागी मुलांचा स्वच्छतेचा खेळ

प्रजासत्ताक दिनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे मैदानात रूपांतर; मुलांकडून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश
Cleanliness Initiative
Cleanliness InitiativePudhari
Published on
Updated on

पुणे: कसबा पेठेतील वस्तीतील मोकळ्या जागेवर जिथे मध्यरात्री किंवा अगदी पहाटे कचरा टाकण्यासाठी नागरिक येतात अन्‌‍ येथे कचरा टाकून जातात. हेच चित्र बदलण्यासाठी मुलांनी पाडू आता इथे हा उपक्रम हाती घेतला अन्‌‍ स्वच्छतेचा संदेश दिला. जिथे नागरिक कचरा टाकतात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून मुलांनी येथे क्रिकेट आनंद घेतला आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला. वस्तीतील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम मुलांनी केले.

Cleanliness Initiative
Pune TB Nutrition Scheme: निधीअभावी पुण्यातील क्षयरोग रुग्ण पोषण योजनेपासून वंचित

भीमनगरवस्तीतील १०-१५ वयोगटातील ते मुलांनी स्वच्छ संस्था आणि पुणे महानगरपालिकेच्या साथीने वस्तीतील सार्वजनिक मोकळ्या जागेवर कचरा पडू नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याच जागी क्रिकेट स्पर्धा निश्चय केला. त्या जागेचे खेळाच्या छोट्या मैदानात रूपांतर करण्यात आले. यासाठी संस्थेच्या समन्वयकांनी मुलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले आणि स्पर्धांचे आयोजन देखील केले.

Cleanliness Initiative
Pune Crime: एकतर्फी प्रेमातून दुहेरी खून; नराधम अटकेत

परिसरात स्वच्छ संस्था आणि पुणे महानगरपालिका यांचा उपक्रम सात दिवसांची कचरा संकलन सेवा राबवली जात आहे. कसबा पेठ आणि भवानी पेठ परिसरातील स्वच्छतेची गुणवत्ता सुधारावी, नागरिकांना समान कचरा संकलन सेवा मिळावी तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे कचऱ्याचे ढीग किंवा ‌‘क्रॉनिक स्पॉट्‌‍स‌’ कमी व्हावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Cleanliness Initiative
Pune Crime: ड्रग तस्करीचा मास्टरमाईंड पोलिस हवालदारच

हे ठिकाण पूर्णपणे भरलेले असायचे. आता ही जागा स्वच्छ झाली आहे, त्यामुळे आम्ही येथे रोज आहोत, आता आमच्या परिसरात कुणीही रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत, अशा विविध प्रतिक्रिया मुलांनी नोंदवल्या. कालपर्यंत कचऱ्याचा ढीग असलेली ही जागा आता मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा बनली आहे.

Cleanliness Initiative
Pune Crime: पुणे हादरले! पती-पत्नीचा वाद झाला अन् आईने पोटच्या मुलाचा जीव घेतला

सोमवारी सुनील यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या साथीने या जागेची स्वच्छता केली आणि स्वच्छ संस्थेच्या समन्वयकांनी घरोघरी जाऊन उघड्यावर कचरा न टाकता कचरावेचकांना कचरा कचरा जनजागृती केली. मुलांनी पुन्हा मिळवलेल्या या भिंतीवर पाडू आता इथे असा संदेश लिहिण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news