कर्मयोगी साखर कारखाना प्रकरण; दिल्ली पोलिसांचे पथक इंदापुरात

कर्मयोगी साखर कारखाना प्रकरण; दिल्ली पोलिसांचे पथक इंदापुरात

पुणे: पुढारी वृत्तसेवा :  नवी दिल्ली येथील न्यायालयामध्ये सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2019 मध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांच्या विरोधात दखल केलेल्या खटल्यात सतत गैरहजर राहणार्‍या महत्त्वाच्या व्यक्तीवर अटक वॉरंट बजावण्यासाठी नवी दिल्ली पोलिसांचे पथक शनिवारी इंदापूर येथे आले होते. सुनावणीस गैरहजर राहिल्याने दिल्लीचे 207 महानगर दंडाधिकार्‍यांनी हे वॉरंट काढले असून पोलिस उपायुक्तांकडे अंमलबजावणीसाठी दिले होते. याची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली येथून पाच पोलिसांचे पथक शुक्रवारी (दि.25) रात्री इंदापूर येथे आल्याचे समजते.

ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरली, यामुळे शनिवारी दिवसभर संपूर्ण इंदापुरात एकच खळबळ उडाली. इंदापूर पोलिस व दिल्ली पोलिस यांच्यामध्ये बर्‍याच वेळ खलबते झाल्यानंतर हे पथक हे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थाळाकडे गेल्याची चर्चा होती. या वेळी त्यांच्याबरोबर कारखान्याचे एक जबाबदार अधिकारी पण उपस्थित होते. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच सहायक पोलिस निरीक्षक यांचेशी संपर्क केला असत, आम्हाला काहीच माहिती नाही, अशी प्रतिक्रिया या सर्वांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news