शिक्रापूर : करंदी-केंदूर ग्रामस्थांचे बस बंदबाबत आंदोलन

शिक्रापूर : करंदी-केंदूर ग्रामस्थांचे बस बंदबाबत आंदोलन

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: वाघोली ते करंदी-केंदूर तसेच भोसरी ते केंदूर-पाबळ ही बससेवा पीएमपीएलकडून बंद करण्याचा घाट घातला जात असताना करंदी व केंदूर येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी करत बसचालक तसेच वाहक यांचा फेटा बांधून तसेच श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच लोकांसाठी उपयुक्त असलेली बस बंद करू नये म्हणून संदेश दिला.

केंदूर व करंदी परिसरातून भोसरी व वाघोली या शहराच्या ठिकाणी जोडणार्‍या बस बंद झाल्यास या परिसरातील विद्यार्थी, नागरिक व कामगारांचे मोठे हाल होणार आहेत. पुणे व पिंपरी शहरामध्ये जाण्यासाठी या गावांमधून कुठलीही दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. या भागातील अनेक विद्यार्थी वाघोली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर पुणे व भोसरी येथे कामगार वर्ग ये-जा करत असतो. ही बस बंद झाल्यास या ठिकाणी मोठा परिणाम होणार आहे. या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसून येत आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विकास दरेकर, केंदूरचे सरपंच अविनाश साकोरे, सचिन नप्ते, संतोष दरेकर, अनिल नप्ते, अविनाश साकोरे, माजी उपसरपंच विशाल खरपुडे आदींसह विद्यार्थी, प्रवासी व केंदूर-पाबळ, करंदी, पिंपळे जगताप, वाजेवाडी, मांजरेवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर तीव्र आंदोलनाचा इशारा

वाघोली ते करंदी-केंदूर तसेच भोसरी ते केंदूर-पाबळ ही बस बंद केली तर पुणे- नगर महामार्ग व चाकण- शिक्रापूर महामार्गावर रास्ता रोको करून तीव— आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news