पुण्यात कांजूरमार्ग होऊ देणार नाही ! माजी महापौर मुरलीधर मोहोळ

पुण्यात कांजूरमार्ग होऊ देणार नाही ! माजी महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय आदित्य ठाकरे यांनी निवडला होता. पुण्यातील विकास प्रकल्पाचा असा 'कांजूरमार्ग' होऊ देणार नाही, अशी टीका माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. ठाकरे यांनी शनिवारी वेताळ टेकडीला भेट देऊन प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली होती. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली होती. त्यावर आता मोहोळ यांनी पत्रकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.

मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका. नदीकाठसुधार आणि बालभारती-पौड फाटा रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत. तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सूचनांचा विचार करून पुढे जाऊ. पण बालभारती-पौड फाटा रस्ता रद्द करण्याची मागणी करण्याचा ठाकरे यांना नैतिक अधिकार काय?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news