सासवड : कानिफनाथगडावर रंगला आनंदोत्सव; रंगपंचमीनिमित्त शिखरावर रंगांची उधळण

बोपगाव येथील श्री क्षेत्र कानिफनाथगडावरील मंदिराच्या शिखरावर भाविकांनी रंगांची उधळण केली.
बोपगाव येथील श्री क्षेत्र कानिफनाथगडावरील मंदिराच्या शिखरावर भाविकांनी रंगांची उधळण केली.
Published on
Updated on

सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : बोपगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कानिफनाथगडावर रविवारी (दि. 12) रंगपंचमी (आनंदोत्सव यात्रा) पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी झाली. गडावर आणि मंदिराच्या शिखरावर भाविकांनी रंगांची उधळण केली. रविवारी पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने पूजा, अभिषेक करण्यात आला. सकाळी 9 वाजता बोपगाव येथून नामदेव कुंभार यांच्या घरातून पालखी व मानाच्या शिखरकाठीचे पूजन झाले. त्यानंतर पालखी व काठी भैरवनाथ मंदिरात आली.

तेथून पुढे हा लवाजमा वाजतगाजत कानिफनाथ मंदिरावर गेला. या वेळी सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची येथील मानाच्या शिखरकाठ्या गडावर दाखल होत यात्रेत सहभागी झाल्या. दुपारी 12 वाजता नाथांची आरती झाली. त्यानंतर साडेबारा वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांना रंग लावण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या शिखरावरून भाविकांच्या अंगावर रंगांचे शिंपण करण्यात आले. या वेळी मंदिर परिसरात शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर परिसर विविध रंगांनी रंगून गेला होता.

कानिफनाथ महाराजांची मूर्ती
कानिफनाथ महाराजांची मूर्ती

सरपंच शालन फडतरे, उपसरपंच हर्षदा पवार, ट्रस्टचे अध्यक्ष माऊली फडतरे, उपाध्यक्ष मंगेश फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, आनंदराव फडतरे, विश्वस्त शिवाजी जगदाळे, दयानंद फडतरे, प्रकाश फडतरे, योगेश फडतरे, पोलिस पाटील विनायक गायकवाड, व्यवस्थापक संतोष गोफणे आदींसह विविध सेवाभावी मंडळांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.
यात्राकाळात सासवडचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, 8 कर्मचारी, दोन वाहतूक पोलिस, 10 होमगार्ड आदींनी बंदोबस्त ठेवला.

पुरंदरचे वैद्यकीय अधिकारी विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नम्रता भंडारे, डॉ. दीपाली कोळेकर, आरोग्यसेवक आनंद अडसूळ, नवनाथ घुले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लता पवार, अविनाश गुरव, आरोग्यसेविका सुजाता कटके, आशा स्वयंसेविका मंगल दळवी, सुरेखा लोणकर आदींनी भाविकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news