

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी शपथ घेतली. हा शपथविधीचा सोहळा त्यांच्या मूळ गावी कनेरसर (ता. खेड, जि.पुणे) येथील नागरिकांनी टीव्हीवर आवर्जून पाहिला. यापूर्वी त्यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. देशाचे सरन्यायाधीश म्हणून पिता, पुत्रांनी आगळावेगळा विक्रम झाला आहे. देशाला दोन सरन्यायाधीश देण्याचा बहुमान मिळत असल्याने याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगत अतिशय आनंद होत असल्याची भावना कनेरसर येथील नागरिकांनी व्यक्त केली.
गावाच्या वतीने न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे अभिनंदन करण्यासाठी काही ग्रामस्थ दिल्लीतदेखील दाखल झाले आहेत. चंद्रचूड यांचे पूर्वज पेशव्यांचे वकील म्हणून ओळखले जात. त्यांना खेड तालुक्यातील कनेरसर सह सात गावे वतन म्हणून पेशव्यांनी दिली होती. कनेरसर या ठिकाणी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा त्यांचा वाडा अजूनही सुस्थितीत आहे. तसेच चंद्रचूड कुटुंबाची शेती ही पूर कनेरसर या गावांमध्ये आहे, अशा आठवणी येथील नागरिकांनी आवर्जून सांगितल्या.
गावाला आल्यावर मिरवणूक माजी न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश होत इतिहास रचला आहे. 1985 साली ग्रामस्थांनी तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांची गावी बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. धनंजय चंद्रचूड हे गावाला परतल्यावर अशाच पद्धतीने त्यांची मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत करण्यात येईल, असे माजी सरपंच जवाहर दौंडकर यांनी सांगितले.
गावाची खुशाली नेहमीच विचारतात : सुनंदा गोविंद चंद्रचूड
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या चुलती सुनंदा गोविंद चंद्रचूड यांनी सांगितले की, आमचे कुटुंब सुमारे अडीचशे वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. गावातील शेतसारा जमा कारण्याचे काम कुटुंब करत असे. चंद्रचूड कुटुंबाच्या अनेक