पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी ज्योती कदम

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी ज्योती कदम
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांचा बदल्यांचे सत्र सुरू असून, पुणे जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी पदी माढ्याच्या उपविभागीय अधिकारी ज्योती भूषण लाटे (कदम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला.

उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जात आहेत. पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पदाची धुरा ज्योती कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्या सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. ज्योती कदम यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात हवेली प्रांत अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news