जुनी सांगवीतील डांबरी रस्ता खचला

जुनी सांगवीतील डांबरी रस्ता खचला

दापोडी : जुनी सांगवी ममतानगर मुख्य रस्त्याच्या वळणावरील रस्ता खचल्यामुळे लहान मुले, नागरिक व वाहनचालकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. ममतानगरच्या मुख्य रस्त्यालगत दत्त आश्रम आहे. या आश्रमामध्ये बालचमूंसह ज्येष्ठ नागरिक दर्शनासाठी येत असतात. मात्र, रस्त्यावर भेगा पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एक महिन्यापासून परिसरातील रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील येथील रस्ता खचला होता. त्या वेळी तक्रार केल्यानंतर याची दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.

गुणवत्तेकडे दुर्लक्ष
दुरुस्तीबाबत मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे तक्रार केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की ठेकेदाराकडून काम पूर्ण केले जाते. मात्र, काम सुरू असताना अधिकार्‍यांकडून कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जाते. परिसरातील कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news