Jilha Parishad Election EVM: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदानयंत्रांची उपलब्धता चौपट

महापालिका निवडणुकीतील अनुभवातून राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
EVM
EVMPudhari
Published on
Updated on

पुणे: नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतदानयंत्रे बंद पडल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानयंत्रांची उपलब्धता दोनपटऐवजी चारपट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 3 हजार 605 मतदान केंद्रे असून, यासाठी 14 हजारांहून अधिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 5 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे.

EVM
Mula Mutha River Pollution: मुळा-मुठा नदीतील ऑक्सिजन पातळी घसरली; सीडब्ल्यूपीआरएसचा गंभीर अहवाल

नगरपरिषद व त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएम व कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते एक तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती. यंत्रांची उपलब्धता कमी असल्याने तातडीने यंत्रे बदलण्यासाठी मोठा वेळ लागत होता. परिणामी, मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर रांगा असल्याचे चित्र दिसून आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता चारपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

EVM
GBS Outbreak Pune: जीबीएस उद्रेकाला वर्ष पूर्ण; तरीही महापालिका अद्याप निष्क्रिय

राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांच्या दुपटीहून अधिक यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार 3 हजार 605 मतदान केंद्रांसाठी 7 हजार 931 मतदानयंत्रे व 3 हजार 966 कंट्रोल युनिट देण्यात आली होती. मात्र मतदान प्रक्रियेदरम्यान यंत्रे किंवा कंट्रोल युनिट बंद पडल्यास तातडीने बदल करता यावा, यासाठी आता 3 हजार 605 मतदान केंद्रांसाठी 14 हजार 40 मतदानयंत्रे व 5 हजार 813 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

EVM
Illegal E-Cigarette Sale: पुण्यात बेकायदा ई-सिगारेट व हुक्का फ्लेवर विक्रीवर गुन्हे शाखेची कारवाई

नादुरुस्त ईव्हीएम भोसरी गोदामात सीलबंद

महापालिका निवडणुकीत एकूण 1 हजार 192 मतदानयंत्रे व 812 कंट्रोल युनिट बंद पडले होते. ही सर्व नादुरुस्त यंत्रे जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद करून ठेवण्यात आली आहेत.

महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मतदानयंत्रे व कंट्रोल युनिट बंद पडल्यानंतर तातडीने नवीन यंत्र व कंट्रोल युनिट बदलण्यासाठी यंत्रांची उपलब्धता चारपट करण्यात आली आहे.

नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक यंत्रे व्यवस्थापन कक्ष

EVM
Mera Gaon Mera Dharohar Scheme: ‘मेरा गाव मेरा धरोहर’ उपक्रमातून देशातील 6.5 लाख गावांचा सांस्कृतिक वारसा डिजिटल होणार

इंदापूरमध्ये सर्वाधिक, वेल्ह्यात सर्वांत कमी मतदान केंद्र

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 400 मतदान केंद्र असून, त्यासाठी 1 हजार 664 मतदानयंत्रे व 660 कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत, तर वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी 105 मतदान केंद्र असून, तेथे 437 मतदान यंत्रे व 173 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news