Jejuri Election: पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही! जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी स्वबळावर

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष; उमेदवारी अर्जांच्या सुरुवातीला शून्य प्रतिसाद, पण राजकीय तापमान वाढले
Jejuri News
पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही!Pudhari
Published on
Updated on

जेजुरी : जेजुरी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे. सोमवारी (दि.10) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

जेजुरी नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता येण्यापूर्वी गेली 30 वर्षे माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांची सत्ता होती. मागील निवडणुकीत काँग्रेसने सत्ता खेचून घेतली. काँग्रेसचे दहा नगरसेवक व वीणा सोनवणे या नगराध्यक्षपदी जनतेतून निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक निवडून आले होते.(Latest Pune News)

Jejuri News
Indapur Grape Production: इंदापुरात द्राक्ष उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट; अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह आहे. इच्छुक उमेदवारात तरुणांची विशेषतः उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या मोठी आहे. माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. माजी आमदार अशोक टेकवडे आणि भाजपचे नेते बाबा जाधवराव यांनीही जेजुरी निवडणुकीत लक्ष घातले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनीदेखील उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. 9) निरीक्षक पाठवून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्षपदासाठी जयदीप बारभाई, मनोहर भापकर, संदीप जगताप, अविनाश भालेराव, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, रमेश बयास, नलिनी कामथे आदींनी तर नगरसेवकपदासाठी 40 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

Jejuri News
Maharashtra Air Pollution: महाराष्ट्रावर वायू प्रदूषणाचे भीषण संकट!

भाजपाकडून सचिन पेशवे, सुधीर गोडसे, अजिंक्य देशमुख, गणेश भोसले हे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असून नगरसेवक पदासाठीही इच्छुकांची संख्या मोठी आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी विठ्ठल सोनवणे हे इच्छुक आहेत. नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. शिवसेना इतरांशी आघाडी करणार की स्वबळावर निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे), काँग्रेस आणि काही अपक्षांमध्ये निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपविरोधात अन्य पक्षांची आघाडी करण्यासाठी खलबते सुरू आहेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. या निवडणुकीसाठी मोठी चुरस होण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news