

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. 22) चंपाषष्ठी उत्सव व मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून हरिद्रामार्चन व महाआरती करण्यात आली.
श्री मार्तंड देवसंस्थान व पुणे येथील श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खेडेकर यांच्या वतीने हा विधी पार पडला. या धार्मिक सोहळ्यात पाच हजार महिला भाविकांनी सहभाग घेतला होता. खंडोबा मंदिरासमोर हरिद्रामार्चन, मल्हार सहस्त्रनाम, पूजा अभिषेक महाआरती, यळकोट यळकोट जय मल्हार नामाचा जयघोष, भंडाराची उधळण आदी धार्मिक विधी करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने हजारो भाविकांना महाप्रसाद सेवा उपलब्ध करण्यात आली.
गेल्या वर्षापासून जेजुरी गडावर ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या वतीने हरिद्रामार्चन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी, देवाचे खांदेकरी, मानकरी, पुजारी, नित्य वारकरी, जेजुरी ग््राामस्थ यांच्यासह श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, सखी मंच संचालिका ऐश्वर्या पठारे, बीव्हीजी ग््रुापच्या वैशाली गायकवाड, महालक्ष्मी मंदिर सारसबाग, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, डॉ. भार्गवी गायकवाड , सीमा जोशी, अर्चना बघ, माऊली नाथ हॉस्पिटल, माऊली पाचुंदकर, कुमार शिंदे, कविता खेडेकर, अर्चना क्षीरसागर, दीपा खुडे, साधना दीडभाई, दादासाहेब खोमणे, साधना कोकडे, ज्योती घाटे, ज्योती धमाल, डॉ. प्रज्ञा चव्हाण, रचना झांजले, लिंबराज महाराज देवस्थान, वर्षा थोरवे, सुप्रिया जोशी, प्रताप चोरघे आदींनी या सोहळ्याचे आयोजन केले.