JEE Mains Result 2023 : जेईई मेन्स परीक्षेमध्ये 43 जणांना शंभर पर्सेंटाइल

JEE Mains Result 2023 : जेईई मेन्स परीक्षेमध्ये 43 जणांना शंभर पर्सेंटाइल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य'चा (जेईई-मेन्स) निकाल शनिवारी (दि.29) जाहीर करण्यात आला. देशभरातील एकूण 43 विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल मिळवले असून, त्यात राज्यातील मृणाल वैरागडे, रोहित सोमाणी या दोघांचा समावेश आहे.

राष्ट्रीय परीक्षा मंडळ अर्थात एनटीएमार्फत 8 ते 15 एप्रिल या कालावधीत देशभरात जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. 325 शहरांतील 457 केंद्रांवर ही परीक्षा झाली. एप्रिल सत्रासाठी 9 लाख 31 हजार 334 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 8 लाख 8 हजार 367 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यानंतर जानेवारी आणि एप्रिल या दोन्ही सत्रांचा मिळून एकूण निकाल जाहीर करण्यात आला.

दोन्ही सत्रांसाठी मिळून 11 लाख 62 हजार 398 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 11 लाख 13 हजार 325 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दोन्ही सत्रांसाठी नोंदणी केलेल्या 6 लाख 29 हजार विद्यार्थ्यांपैकी 5 लाख 94 हजार 13 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालात मृणाल वैरागडे, रोहित सोमाणी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. दोन्ही सत्रांच्या निकालासह बीई-बीटेक पेपर एकच्या जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठीचे पात्रता गुण जाहीर करण्यात आले. त्यात खुल्या गटासाठी शंभर पर्सेंटाइल, तर राखीव गटांसाठी 90.77 ते 90.77 पर्सेंटाइल आवश्यक ठरणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news