Midday Meal| बोलाची कढी अन् नुसताच भात; विद्यार्थी अजूनही चमचमीत १५ पदार्थांपासून वंचित

विद्यार्थ्यांना केवळ खिचडी आणि कधीतरी अंडी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दै. 'पुढारी'च्या पाहणीत उघडकीस आला आहे.
पोषण आहार
पोषण आहारपोषण आहार संग्रहित फोटो
Published on
Updated on

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात १५ पाककृती देण्याचा निर्णय राज्य शासनाने जून महिन्यात घेतला. परंतु, हा निर्णय शाळांमध्ये अद्यापही कागदावरच असून, विद्यार्थ्यांना केवळ खिचडी आणि कधीतरी अंडी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दै. 'पुढारी'च्या पाहणीत उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थी अजूनही चमचमीत १५ पदार्थांपासून दूरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोषण आहार
गरिबांच्या रेशनवर सरकारी कर्मचाऱ्यांनी मारला डल्ला

दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधींनी ज्या शाळांमध्ये माध्यान्ह भोजन दिले जाते, अशा शहरातील विविध शाळांमध्ये शासनाच्या नल्या परिपत्रकाप्रमाणे १५ प्रकारच्या पाककृती दिल्या जात आहेत का? विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार मिळतो का? शालेय पोषण आहारासाठीची किचनव्यवस्था कशाप्रकारे आहे? याची पाहणी केली.

यामध्ये संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या १५ पाककृतींचे एकाही शाळेत वाटप होताना दिसले नाही. शासन निर्णय जाहीर होऊन तब्बल एक महिना होत आला, तरी देखील शाळांमध्ये विद्याथ्यांची केवळ खिचडीवरथ बोळवण केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना १५ पाककृती द्याव्यात, या निर्णयाला शाळांकडूनच केराची टोपली दाखविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोषण आहार
जागतिक लोकसंख्या दिन विशेष : देशाच्या लोकसंख्येत तब्बल 105 कोटींची भर!

राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाच्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणीसत्य, अंडापुलाव, तांदळाची खिचडी, अशा पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे. पाककृती दरदिवशी एक माप्रमाणे बारा दिवस द्यायच्या आहेत

चार दिवस दररोज तांदळाची खीर द्यावी आठवड्यातील चार दिवस दररोज तांदळाची खीर, एक दिवस नाचणीसत्त्व नियमित पाककृतीसोबत द्यावी, अंडी खाणाऱ्या विद्याथ्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव, अंधी न खाणाऱ्या विद्याथ्यांना व्हेजिटेबल पुलाब ग्राला, अंडी न खाणाच्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दरमचदित केळी अथया स्थानिक फळे द्यावीत. त्या दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्त्व, मोड असलेले कडधान्य (स्प्राउट्स) देण्यात येऊ नयेत, असे शासनाचे धोरण आहे.

विद्यार्थ्यांना नेमके द्यायचे काय? विद्याथ्यांना देण्यात येणाऱ्याचा मध्याना भोजनात वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यांपासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ महणून तांदळाची खीर, नाचणीसत्त्व यांचा समावेश असलेला तीन संरचित आहार (श्री कोर्स मील) देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाब, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटार पुलाब, गौड खिचडी, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मूग-शेवगा, वरण-भात, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणीचे सत्य, सोयाबीन पुलाब, मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.

'पुढारी'च्या पाहणीत काय आढळले?

  • विद्याथ्यांना केवळ भाताच्या खिचडीचे होते वाटप.

  • काही शाळांमध्ये मोजकीच खिचडी बनविण्यात येते.

  • विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खिचडीच्या दर्जाचाबत प्रश्नचिन्ह.

  • १५ पाककृतीचे वाटप एकाही शाळेमध्ये झालेच नाही.

  • अनेक शाळांमध्ये बाहेरून बनवून आणली जाते खिचडी.

  • अनेक शाळांमध्ये किचनची व्यवस्थाच नाही.

  • दर्जेदार माध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचितच

आमहाला माध्याना भोजरात वटानाभात, सांबार-भात खिचीडी असे पदार्थ मिळतात. लापशी, शीरा असेही पदार्थ दिले जातात. भाताचे प्रकार सर्वाधिक दिले जातात. पदार्थाची चव फारशी टेस्टी नसते शिवाय विविध पदार्थ दिले जावेत, असे वाटते.

प्रतीक (विद्यार्थी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news