पिंपरी : ऐन डिसेंबरमध्ये पडतोय पाऊस; नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव

पिपरी-चिंचवड परिसरात सोमवारीदेखील पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. 	(छाया : यशवंत नामदे.)
पिपरी-चिंचवड परिसरात सोमवारीदेखील पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. (छाया : यशवंत नामदे.)

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि.12) शहरातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. ऐन थंडीच्या महिन्यात पाऊस पडल्याने नागरिकांना पावसाळ्याचा अनुभव मिळाला. शहरामध्ये गेली दोन दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला आहे. मध्येच थंडीचा जोर वाढत असताना अचानक पाऊस पडल्याने नागरिकांना संमिश्र वातावरणाचा अनुभव मिळत आहे.

रविवारी रात्री आलेल्या पावसामुळे दुसर्‍या दिवशीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. यानंतर दुपारनंतर चिंचवड स्टेशन व परिसरात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी आडोसा शोधला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news