पुणे : अपघात रोखण्यासाठी वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे : सुप्रिया सुळे

पुणे : अपघात रोखण्यासाठी वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे : सुप्रिया सुळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर सेवा रस्ता करणे गरजेचे आहे. महापालिकेने हे काम अद्याप केले नाही. नवले पूल परिसरातील तीव्र उतारावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तेथील अपघात रोखणे; तसेच तीव्र उतार कमी करण्यासाठी तातडीने रस्ते वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पूल परिसराची पाहणी केली. त्या म्हणाल्या की, या भागात सातत्याने अपघात होत असल्याने लोकसभेत मी गेल्या वर्षी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल; तसेच अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते.

पुणे महापालिकेने या भागात सेवारस्ता तयार करणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. नवले पूल परिसरातील तीव्र उताराच्या परिसरात तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. तातडीने उतार कमी करण्यासाठी उपाययोजना केल्यास गंभीर स्वरुपाचे अपघात कमी होतील, अपघात रोखण्यासाठी चालकांनी देखील नियमांचे पालन करणे गरजे आहे, असेही सुळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news