

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी महेश राऊतला आजीच्या अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.२१ जून) दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
राऊतच्या जामीन अर्जावर विक्रम नाथ आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आजीच्या अंत्यसंस्कारानंतर केल्या जाणाऱ्या विधीसाठी २६ जून ते १० जुलैपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी राऊतच्या वकिलाने केली. न्यायालयाने ती मान्य केली.
महेश राऊतला यापूर्वी जून २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, एनआयए या तपास संस्थेने विरोध केल्यानंतर न्यायालयाने जामीनाला स्थगिती दिली होती.