Friend Request Assault Shirur: फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याचा राग! तरुणावर लाकडी दांडक्यांनी मारहाण

इंस्टाग्रामवरील रिक्वेस्ट नाकारल्याने चौघांचा हल्ला; शिरूर पोलिसात गुन्हा दाखल
Friend Request Assault Shirur
इंस्टाग्रामवरील रिक्वेस्ट नाकारल्याने चौघांचा हल्लाPudhari
Published on
Updated on

टाकळी हाजी : इंस्टाग्रामवर पाठविलेली फेंड रिक्वेस्ट स्वीकारली नसल्याने चिडून आमदाबाद-टाकळी हाजी रस्त्यावरील डोंगरगण चौफुला येथील हॉटेल स्वरा येथे तरुणास लाकडी दांडक्यांनी, लाथा-बुक्क्यांनी व हाताने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.(Latest Pune News)

Friend Request Assault Shirur
Asha Workers Salary Delay: सहा महिने पगार नाही! साहेब, तुम्हीच सांगा, घर कसे चालवायचे?

फिर्यादी रोहन मळीभाऊ खामकर (वय 21, रा. शिनगरवाडी, ता. शिरूर) हा मंगळवारी (दि. 30) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगरगण फाट्यावरील हॉटेल स्वरा येथे फॅबिकेशनचे काम करीत होता. या वेळी चार-पाच दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पाठविलेली फेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही, याचा राग धरून अमर मुंजाळ (रा. डोंगरगण), हर्षद खाडे व करण चव्हाण (दोघेही रा. म्हसे बुद्रुक) तसेच सचिन पवार (पत्ता माहित नाही) यांनी फिर्यादीवर हल्ला केला. या चौघांनी लाकडी दांडके, हाताने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीच्या डोक्यात, तोंडावर व हातावर मारहाण केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news