चाकण : मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली; भावात शंभर रुपयांची वाढ

चाकण : मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली; भावात शंभर रुपयांची वाढ
Published on
Updated on

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण व कैरीची मोठी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. फळभाज्यांच्या व पालेभाज्यांच्या बाजारात तरकारी मालाची आवक वाढली. लसणाची भरपूर आवक होऊनही भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल आणि शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 4 कोटी 10 लाख रुपये झाली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 10 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 हजार क्विंटलने वाढूनही भावात 100 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 900 रुपयांवरून 1,000 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 1,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली व भावात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1,400 रुपयांवरून 1,500 रुपयांवर पोहचला.

लसणाची एकूण आवक 60 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 25 क्विंटलने वाढली व कमाल भाव 7 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 395 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 125 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 10,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,000 रुपये, भाव क्रमांक 2. 850 रुपये, भाव क्रमांक 3. 700 रुपये. बटाटा – एकूण आवक – 1,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,500 रुपये, भाव क्रमांक 2. 1,250 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो – 300 क्विंटल (1,000 ते 1,500 रुपये), कोबी – 235 क्विंटल (300 ते 500), फ्लॉवर – 270 क्विंटल (500 ते 1,200), वांगी – 158 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 28 क्विंटल (5,000 ते 7,000), शेवगा – 55 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 78 क्विंटल (1,000 ते 1,600).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी – एकूण 14 हजार 600 जुड्या (1,000 ते 1,500 रुपये), कोथिंबीर – एकूण 19 हजार 400 जुड्या (500 ते 1,400), शेपू – एकूण 500 जुड्या (500 ते 1,000), पालक – एकूण 2 हजार 100 जुड्या (400 ते 600).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 44 जर्शी गायींपैकी 25 गायींची विक्री झाली (15,000 ते 60,000 रुपये), 169 बैलांपैकी 145 बैलांची विक्री झाली (10,000 ते 40,000 रुपये), 182 म्हशींपैकी 152 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 85 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. 8,740 शेळ्यांपैकी 8,220 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news