

पुणे : इंडिगो विमान व्यवस्था हळूहळू सुरू होत आहे. आत्तपर्यंत 90 टक्के विमानसेवा सुरळीत झाली आहे. ज्यांची चूक झाली त्यांची चार सदस्य नेमून चौकशी केली जाणार आहे.
प्रवाशांना नुकसान भरपाई देखील दिली जात असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला
मोहोळ म्हणाले, इंडिगो विमानसेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. आता पुण्यातून अनेक ठिकाणी जाण्यासाठी फ्लाईट उपलब्ध झाल्या आहेत. सरकार म्हणून झालेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवाबद्दल मोहोळ म्हणाले,
संगणकाच्या या युगात पुस्तक वाचनासाठी चालना देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे पुण्याची एक वेगळी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. महापालिका निवडणुकी संदर्भात मोहोळ म्हणाले, महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी पाहून तुमच्या लक्षात आले असेल की पुणेकरांची आम्हाला पसंती आहे. तरीदेखील आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा पक्ष आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेनुसार सर्व प्रक्रिया पार पडणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, इच्छुकांची गर्दी कितीही असली तरी आणि कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची मागणी असली तरी 165 जणांनाच तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नाराजांची आम्ही समजूत काढणार आहोत. दोन राष्ट्रवादी एकत्रित येणे त्यांना स्वांतत्र्य आहे बाकी कोणीही एकत्रित येऊ,पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून एकत्र लढायचा राहणार असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले तसेच लवकरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील या प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्या विषयी विचारले असता पाटील यांनी लोकशाहीची सुंदरता एवढी आहे कोणीही काहीही म्हणू शकते आंबेडकर यांना वाटले ते म्हटले असा टोला देखील त्यांनी लगावला.