

पुणे : पुणे विमानतळावर सलग अकराव्या दिवशी शनिवारी (दि.13) रोजी इंडिगोची 12 विमाने रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
ट्रॅफिक कंजेक्शन (विमान कोंडी) झालेला 'पार्किंग बे' रिकामा झाल्यामुळे इंडिगोची विमाने आता निर्धारित वेळापत्रकानुसार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा विमाने रद्द होण्याची संख्या कमी होत आहे.
लवकरच ती पूर्वपदावर येईल, असा विश्वास विमानतळ प्रशासनाने व्यक्त केला आहे.