Indian Supercross Racing League Pune 2025: खेळांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र आघाडीवर : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात 25 ऑक्टोबरपासून इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग; स्थानिक खेळाडूंना जागतिक मंच
Indian Supercross Racing League Pune 2025
इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर.Pudhari
Published on
Updated on

पुणे : खेळांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे पुण्यात इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे केंद्र म्हणून आपल्या शहराचे स्थान अधिक बळकट तर होतेच, पण जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबतच आपली प्रतिभा दाखविण्यासाठी स्थानिक खेळाडूंना एक मंच उपलब्ध होतो. ‌‘आयएसआरएल‌’सारखे उपक्रम तरुणांना एका ध्येयाने खेळण्यास प्रेरित करतातच पण जागतिक क्रीडा केंद्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात महाराष्ट्राचे स्थान अधिक भक्कम करतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.(Latest Pune News)

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) हंगाम 2 मधील पहिल्या राउंडच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेचे आयोजन दि. 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू होणार आहे. ही स्पर्धा नंतर जागतिक दर्जाच्या सुपरक्रॉस ट्रॅकमध्ये रूपांतरित होईल. 15,000 हून अधिक चाहते या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत.

Indian Supercross Racing League Pune 2025
MASAP elections 2025 announcement: दहा वर्षांनंतर ‘मसाप’ची निवडणूक? आज वार्षिक सभेत होणार मोठी घोषणा

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणाले, ‌‘आमच्या खेळाडूंना जागतिक स्तरावरील अनुभव देऊन तसेच चाहत्यांना जगातील सर्वोत्तम अनुभव देऊन भारतातील सुपरक्रॉस वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. पुणे हा इंडियन सुपरक्रॉसचे हृदय आणि आत्मा आहे. त्यामुळेच आमच्या आणखी एका साहसी हंगामासाठी ते एक आदर्श लाँचपॅड आहे.‌’ ही स्पर्धा दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार असून, रीझ मोटो फॅनपार्क हा अनेक अनोख्या गोष्टींचा साक्षीदार असेल.परस्परसंवादी सहभाग, गेमिंग झोन, बँड सक्रियकरण, खास गोष्टी आणि रायडर्सची भेट अशा अनेक गोष्टी त्यात असतील. मुख्य शर्यती दुपारी 3 ते 5:30 पर्यंत चालतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news