

Indian Railways News
पुणे : सीमावर्ती भागात जाणार्या रेल्वे गाड्यांच्या तिकीट कॅन्सलेशनमध्ये वाढ होत आहे. पुण्यातून राजस्थानमधील जयपूर, जोधपूर तर कश्मीरमधील जम्मूला जाणार्या रेल्वे गाड्यांचे तिकीट झपाट्याने रद्द होत आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा रेल्वे प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत असून, तिकीटांच्या प्रतीक्षा याद्या 10-20 ने नव्हे तर 100 ते 200 ने कमी झाल्या आहेत.
युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याअगोदर सीमावर्ती भागात जाणार्या 'पुणे-जयपुर, पुणे जम्मू तावी, पुणे (हडपसर)- जोधपुर या तीन गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद होता. 300 ते 350 या गाड्यांना वेटिंग होते. मात्र, शुक्रवारच्या (दि.09) पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यानंतर शुक्रवारी दिवसभर झपाट्याने तिकिटे रद्द व्हायला सुरुवात झाली. त्याचे प्रमाण इतके मोठे होते की, प्रतिक्षा यादीतून या तीन गाड्यांचे वेटींग सुमारे 200 ने कमी झाले.
पूर्वी याच गाड्यांना उन्हाळी पर्यटनामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मात्र जम्मू, राजस्थान भागात सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीनंतर तीनही गाड्यांची वेटिंग लिस्ट कमी व्हायला लागले आहे. शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रतीक्षा यादी 150 ते 200 ने कमी झाल्याचे समोर आले आहे.
क्लास - पूर्वीचे वेटींग - शुक्रवारचे वेटींग
1) सेकंड एसी - 98 - 14
2) थर्ड एसी - 287 - 57
3) स्लीपर - 376 - 99
क्लास - पूर्वीचे वेटींग - शुक्रवारचे वेटींग
1) फर्स्ट एसी - 12 - 09
2) सेकंड एसी - 56 - 20
3) थर्ड एसी - 143 - 59
3) स्लीपर - 164 - 64
क्लास - पूर्वीचे वेटींग - शुक्रवारचे वेटींग
1) सेकंड एसी - 19 - 08
2) थर्ड एसी - 43 - 20
3) स्लीपर - 186- 45