Indian Railways: भारतीय रेल्वे म्हणजे प्रवासासह सांस्कृतिक ऐक्याचा मजबूत दुवा: डॉ. केतन गोखले

पुण्यातील कार्यक्रमात रेल्वेच्या इतिहास, सुरक्षितता आणि देशाच्या एकात्मतेतील भूमिकेवर प्रकाश; भारतीय रेल्वे सर्वांत विश्वासार्ह प्रवाससाधन असल्याचा विश्वास
Indian Railway
Indian RailwayPudhari
Published on
Updated on

पुणे: भारतीय जनमानसात मोलाचे स्थान असलेली रेल्वे म्हणजे फक्त दळवळण किंवा प्रवासाचे साधन नाही, तर रेल्वे प्रवासातून कौटुंबिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक आदान-प्रदान होते. भारतीय रेल्वे हे सगळ्यात विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रवाससाधन आहे, असे मत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. केतन गोखले यांनी व्यक्त केले.

Indian Railway
Palkhi Sohala Theft: पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; १० महिलांचे दागिने लंपास, मोबाईल चोरट्यांसह तिघे जेरबंद

पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर, डॉ. शिरीष यंदे, हेमंत जोगदेव आणि आशिष कुवेलकर तसेच रोहन प्रकाशनचे संस्थापक-संचालक प्रदीप चंपानेरकर उपस्थित होते.

Indian Railway
Sant Sopandev Maharaj Palkhi Sohala: 'धन्य धन्य निवृत्तीदेवा'च्या अभंगात संत सोपानदेव महाराज पालखीचे सासवडहून पंढरपूरकडे भक्तिमय प्रस्थान

डॉ. केतन गोखले म्हणाले की, भारतातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी सुरू झाली. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वांत मोठी आणि आशियातील सर्वांत मोठी रेल्वेप्रणाली आहे. याची सुरुवात मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे यादरम्यान झाली. त्यानंतर आजपर्यंत भारतीय रेल्वे विभागाने केलेली प्रगती ही अत्यंत कौतुकास्पद आहे.

Indian Railway
Changavateshwar Maharaj Palkhi Sohala: हरिनामाच्या गजरात संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखीचे सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान

अतिशय शिस्तबद्ध स्वरूपाची सांकेतिक एकरूपता हे भारतीय रेल्वेच्या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्य आहे. लहानपणापासून अनेकांना लोको पायलट किंवा टीसी होण्याचे स्वप्न असते. माझेही होते; मात्र मला रेल्वेचा उच्चपदस्थ अधिकारी होण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.

Indian Railway
Yavat Palkhi Annadan: यवतची ८२ वर्षांची अन्नसेवा परंपरा कायम; लाखो वारकऱ्यांसाठी दीड टन पिठलं आणि दीड लाख भाकऱ्यांची मेजवानी

रोहित चंदावरकर म्हणाले की, भारतीय रेल्वे हे एक अफाट असे क्षेत्र आहे, की ज्यामुळे संपूर्ण भारतातील वैविध्यपूर्ण प्रांत एकमेकांशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडले जातात. भारतीय रेल्वे हे असे एकमेव सरकारी कार्यालय आहे, की तिथे जाताना व्यक्तींना आनंद होतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण चितळे यांनी केले. सूत्रसंचालन ममता क्षेमकल्याणी यांनी केले. आशिष कुवेलकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news