

पुणे: भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध करणाऱ्यांनी रविवारी रात्री घरी बसून हा सामना पाहण्याचा आनंद घेतला. त्यांचे व्हिडीओ आमच्याकडे आले आहेत, असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (दि.15) पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (दि.14) झालेल्या टी- 20 आशिया कप भारत-पाक क्रिकेट सामना झाला. हा सामना होऊ नये, याकरिता शिवसेना उबाठा गटाकडून देशभरात तीव आंदोलने केली. (Latest Pune News)
भारतातील हिंदु महिलांचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळू नये, याकरिता या सामन्याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला. तसेच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर जोरदार टीका केली होती. पुणे दौऱ्यावर असताना
मंत्री सरनाईक यांना याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी विरोध करणारेच रात्री घरी बसून, मॅच पाहत होते.असे आम्हाला सांगितले. याशिवाय त्यांचे व्हिडीओही आमच्याकडे आहेत, असेही ते या वेळी म्हणाले,