आयटी कंपनीत तरुणीशी अश्लील कृत्य; एकावर गुन्हा दाखल

आयटी कंपनीत तरुणीशी अश्लील कृत्य; एकावर गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : औंध भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करणार्‍या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीतील अधिकार्‍याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने
दिलेल्या फिर्यादीनुसार, रतनेश डांगी (वय 45, रा. पंचशील टॉवर्स, खराडी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आयटीआय रोड औंध येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ओैंध भागातील एका आयटी कंपनीत एचआर म्हणून काम करते, तर आरोपी रतनेश हा उच्चपदस्त अधिकारी आहे. रतनेश गेल्या सहा महिन्यांपासून तरुणीचा कामावरून सुटल्यानंतर पाठलाग करीत होता. कामाच्या बहाण्याने तो तिला केबिनमध्ये बोलावून घेऊन त्रास द्यायचा. त्यानंतर त्याने तरुणीला पगार दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. तिला केबिनमध्ये बोलावून अश्लील कृत्य केले. त्याच्या त्रासामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news