शेटफळगढे; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालवा आणि वितरिकांची दुरुस्ती करण्याची मागणी तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या कामांसाठी जलसंपदा विभागाकडून निधीची तरतूदच करीत नसल्याचे चित्र आहे. खडकवासला कालव्यावर इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, निरगुडे, अकोले, कळस, न्हावी, रुईपासून तरंगवाडी तलावापर्यंत अनेक गावांच्या पाणी योजना व शेती अवलंबून आहे. मात्र, कालव्याला पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने जेमतेम पाण्यावरच शेती करावी लागत आहे. कालव्यालगत गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही अवलंबून आहेत. मात्र, पाणी कमी असल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
मार्च महिन्यात कालव्याला पाणी आल्याने काही प्रमाणात पाणी संकट टळले. मात्र, एप्रिलच्या शेवटी अथवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कालव्याला पाणी न आल्यास शेतीसह पाणी योजना अडचणीत येणार आहेत. त्यातच कालव्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण केले आहेत. मात्र, जलसंपदा विभाग लक्ष देत नसल्याची तक्रार आहे.
वितरिकांच्या दरवाजाशेजारीच मोठे बांध
पश्चिम भागात तर कालव्यातून वितरिकांच्या दरवाजाशेजारी मोठे बांध घालूनच वितरिकांना पाणी सोडतात. कालव्यात घातलेले बांध पुन्हा तसे ठेवल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात. अडथळे दूर न झाल्यास त्याचे परिणाम वेगळे घडू शकतात. मात्र, याकडे जलसंपदा विभाग दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.